Tarun Bharat

सात मतदारसंघात दोन दिवस मर्यादित पाणीपुरवठा

प्रतिनिधी / पणजी

बाणस्तारी पुलाच्या बेअरिंग्ज आणि जॉईंटस्चे स्ट्रीप सील बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलावरून जाणारी उच्च दाबाची जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे. दि. 24 मार्च रोजी हे काम हाती घेण्यात येणार असून दि. 24 व 25 असे दोन दिवस अनेक भागातील ग्राहकांना मर्यादित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

या पाणीपुरवठय़ाचा परिणाम होणाऱया भागांमध्ये कुंभारजुवा, पणजी, ताळगाव, सांताक्रूज आणि सांत आंद्रे हे संपूर्ण मतदारसंघ तसेच प्रियोळ व मडकई या मतदारसंघातील काही भागांचा समावेश आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयासह सर्व औद्योगिक आस्थापनांनाही वरील काळात मर्यादित पाणी पुरविण्यात येणार आहे.

सदर कामामुळे होणाऱया गैरसोयीबद्दल ग्राहकांनी सहकार्य करावे, तसेच स्वतःसाठी व्यापक पाण्याचा साठा ठेवावा, असे साबांखाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केलेल्या पत्रकातून कळविण्यात आले आहे.

Related Stories

कोलमोरोडवासियांचे दोन दिवस पाण्याविना हाल

Amit Kulkarni

मंत्रिमंडळात तूर्त बदल नाहीच

Amit Kulkarni

ऊस उत्पादकांच्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

भोम पंचायतीतर्फे बेकायदेशीर भंगारअड्डय़ावर कारवाई

Patil_p

म्हादई, सीएए विषय विधानसभेत मांडणार

Patil_p

विधानसभेसाठी सर्वांच्याच हालचाली सुरु

Amit Kulkarni