Tarun Bharat

सात महिन्यात चिकूनगुनिया-डेंग्यूचे 124 रुग्ण

सातारा / प्रतिनिधी : 

पावसाळ्याला सुरूवात होताच साथीच्या आजारांना निमंत्रण मिळते. सातारा जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यात चिकूनगुनिया आणि डेंग्यूचा कराड, सातारा, पाटण, फलटण आणि खटाव या पाच तालुक्यात प्रार्दुभाव झाला होता. त्यामध्ये तब्बल चिकूनगुनिया, डेंग्यू यामुळे 124 जणांना बाधा झाली होती. येथील साथी आता नियंत्रणात आल्या आहेत. नागरिकांना कोरडा पाळण्याचे व डास उत्पती केंद्रे नष्ट करण्यासाठी जिल्हा हिवताप केंद्राच्यावतीने मोहीम आखली गेली.  

पावसाळ्यात साथजन्य रोग वाढण्याची शक्यता असते. अगोदरच कोरोनाच्या साथीने सगळ्या जगावर संकट आलेले असताना डेंग्यू, चिकूनगुनिया, हिवताप असेही साथजन्य आजार जिल्ह्यात काही ठिकाणी डोके वर काढताना दिसत आहेत. त्यामध्ये खटाव तालुक्यातील एनकुळ येथे 28 डिसेंबरला 8 जणांना चिकूनगुनियाची लागण झाली होती. त्यातील पाच जणांचे रक्ताचे नमुने तपासले. कराड तालुक्यातील वाठार येथे 11 जानेवारीला 30 जणांना लागण झाली होती. तसेच आटके येथे डेंग्यूची 10 फेब्रुवारीला 7 जणांना बाधा झाली. मुंढे येथील 16 जणांना चिकूनगुनियाची 5 फेब्रुवारीला बाधा झाली होती. कोळेवाडीतील 13 जणांना 3 एप्रिलला डेंग्यूची बाधा झाली होती. 

कासारशिरंबे येथील 10 जणांना 5 एप्रिलला डेंग्यूची बाधा झाली होती. फलटण तालुक्यातील तडवळे येथे 7 जणांना 15 एप्रिलला डेंग्यूची बाधा झाली होती. सातारा तालुक्यातील धनगरवाडीत 8 जूनला तापाचे दोन रुग्ण आढळून आले होते. कोडोली येथे 8 जूनला 7 जण डेंग्यूचे आढळून आले होते. कराड  तालुक्यातील उंब्रज येथे 9 जूनला 6 जण डेंग्यूने बाधित होते तर फलटण तालुक्यातील जिंती येथे 21जूनला 3 जणांना डेंग्यूची बाधा झाली होती, असे जिल्ह्यात सात महिन्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकूनगुनियाचे 124 जण रुग्ण होते.

सातारा पालिकेच्यावतीने साथरोग नियंत्रण जनजागर मोहिम
सातारा नगरपरिषद आरोग्य विभागातर्फे ‘साथ रोग नियंत्रण जनजागर मोहिम-2021′ ही मोहिम राबविण्यात येत आहे. पावसाळ्यादरम्यान डेंग्यू, चिकूनगुनिया, मलेरिया, हिवतापसारखे आजार डोकेवर काढण्याची शक्यता असते.  या मोहिमेअंतर्गत विविध नागरिकांना विविध सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये घराच्या सभोवताली असणारे खड्डे बुजविणे, गटारी वाहती ठेवणे गरजेचे आहे. तसेच इमारतीवरील टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावित. संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे व घराची दारे, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळय़ा बसविणे व झोपताना डास प्रतिबंधक क्रिम, अगरबत्ती यांचा वापर करावा, असे आवाहन सातारा पालिकेच्यावतीने नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.

नागरिकांनी कोरडा पाळावा    

घरातील टायर, भंगार सामान, निकामी डबे, बाटल्या, प्लॅस्टिक साहित्य यांची विल्हेवाट लावावी. घरातील कुलर, फुलदाण्या वेळीस स्वच्छ करून कोरडे ठेवावे. तसेच घरातील व घरासभोवतालची रांजण, बॅरल, हौद यासारखे पाण्याचे साठे व्यवस्थित कापडाने झाकुण ठेवावे. आणि एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डासांच्या चाव्यापासून व्यक्तिगत संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच दैनंदिन पिण्याचे पाणी गाळून, उकळून प्यावे,  
– अश्विनी जंगम,  जिल्हा हिवताप अधिकारी

Related Stories

सातारा पोलीस दलाची मैदानी चाचणीचे गुणपत्रक जाहीर

Archana Banage

राजवर्धनसिंहराजे कदमबांडे यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

Abhijeet Khandekar

छत्रपतींचे सेवक संघटनेकडून किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुर्गसंवर्धन मोहीम

Archana Banage

जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले

datta jadhav

सातारा : औंधला सहा महिन्यांपासून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिळेना

Archana Banage

सुशांत सिंह प्रकरणात सत्य बाहेर येईल

Patil_p