Tarun Bharat

सात महिन्यानंतर हॉटेल-रेस्टॉरंट सेवेत

व्यावसायिकांचा स्वच्छतेवर भर : पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद 

प्रतिनिधी/ सातारा

सोमवारी गेल्या सात महिन्यापासून बंद असणारे हॉटेल-रेस्टॉरंट पुन्हा सातारकरांच्या सेवेत सुरू झाले. सकाळपासून स्वच्छता, नियम यांचे पालन करण्यावर व्यावसायिक, मालक यांनी भर दिला. पहिल्या दिवशी ग्राहकांचा थंड प्रतिसाद होता. तसेच परप्रांतीय, स्थानिक कामगार अद्याप कामावर हजर नसल्याने कमी मनुष्यबळावर हॉटेल सुरू राहणार असल्याचे चित्र दिसत होते.

 अनलॉकची प्रक्रिया राबवत सुरूवातीला काही अटी लागू करत हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांना पार्सल सेवा देण्यास परवानगी देण्यात आली. याला हळुहळू प्रतिसाद वाढत गेला. आणि सोमवारपासून सशर्त डायनिंग सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली. सात महिन्यापासून बंद असलेल्या हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये चैतन्य आले आहे. एवढय़ा दिवसांतून पुन्हा हॉटेल सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने व्यावसायिक, मालक तसेच कामगार यांच्या आनंदाचे वातावरण होते.

 पहिल्या दिवशी व्यावसायिकांनी स्वच्छतेवर भर दिला. हॉटेल धुवून सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. प्रवेशद्वारात सॅनिटायझर स्टॅड ठेवण्यात आले. ग्राहकांना मास्क लावणे, सॅनिटायझर देवून प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तूर्तास 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तरीही पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाला. पार्सल सेवेमुळे कमी कामगार कार्यरत होते. दरम्यान, डायनिंग सेवा सुरू झाल्याने मनुष्यबळाची वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. परप्रांतीय कामगार व स्थानिक कामगार यांना पुन्हा कामावर बोलवण्यात आले आहे. मात्र काही जण आपल्या गावाला गेल्याने येत्या आठ दिवसात ते परत येणार आहेत. यामुळे ठराविक कामगारच्या उपस्थितीत हॉटेल-रेस्टॉरंट सुरू आहेत. धास्ती निर्माण झाल्याने प्रतिसाद कमी मिळत नंतर वाढत जाईल अशी आशा व्यवसायिकांना लागून राहिली आहे.

Related Stories

महाराष्ट्र : 3,431 नवीन कोरोनाबाधित; 71 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

जिल्हय़ात आजपर्यंत ६२९ जण कोरोनामुक्त

Archana Banage

थोरातांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचाली; प्रभारी एच. के. पाटील मुंबईकडे रवाना

datta jadhav

ऊसदरासाठी जिजाऊंच्या लेकी उतरणार रस्त्यावर

Patil_p

कोयना धरणात १०५.०५ टीएमसी पाण्याची आवक

Archana Banage

एनआयएने कुठला जावई शोध लावला?

Patil_p