Tarun Bharat

सात हजारांहून अधिक गावांना मिळणार 4G कनेक्टिविटी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ज्या गावांमध्ये अद्याप मोबाईल कनेक्टिविटी नाही, अशा सात हजारांहून अधिक गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारुन 4 जी सेवा पुरविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

अनुराग ठाकूर म्हणाले, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिशाच्या 44 जिह्यांमधील जवळपास सात हजारांहून अधिक गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून या गावांना 4 जी सुविधा उपलब्ध होईल. या योजनेसाठी जवळपास 6466 कोटी रुपये खर्च होणार आहेत. याशिवाय ग्रामीण आणि दुर्गम भागांना रस्त्यांशी जोडण्यासाठी पंतप्रधान ग्रामीण सडक योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून देशातील गावे रस्त्यांद्वारे जोडली जाऊ शकतील. यासाठी जवळपास 33,822 कोटी खर्च अंदाजित आहे.

Related Stories

देशाने नोंदवलाय अनपेक्षित रेकॉर्ड

datta jadhav

अलास्कात सलग दोन वेळा भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीचा इशारा

datta jadhav

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस शेतकऱयांसोबत

Patil_p

उध्दव ठाकरे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतील, येणारा काळ शिवसेनेचाचं- संजय राऊत

Abhijeet Khandekar

निसर्गाचे रक्षणाचे आमच्यावर संस्कार ः मोदी

Patil_p

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू

datta jadhav