शिये / वार्ताहर
सादळे-मादळेसह शिये, जठारवाडी डोंगर पायथ्याला बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. शिये येथील डोंगर पायथ्याशी जनावरे चरायला घेऊन जाणार्या शेतकर्यांनी दुपारी तीनच्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाले असल्याचे सांगितले.
हा बिबट्या सादळेकडुन आला असून शिये कडील बाजूच्या डोंगरात पाण्याच्या कडेला चिखला लोळताना शेतकरी दिग्विजय पाटील व महादेव गोसावी यांनी पाहीला. त्यानंतर हा बिबट्या जठारवाडीच्या दिशेने गेल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी जठारवाडी गावातील लोकांना फोन करून बिबट्या सदृश प्राणी या परिसरात फिरत असल्याची माहिती दिली. त्यानंतर शिये, जठारवाडी, भुयेवाडी व भुये येथील ग्रामस्थांनी सोशल मिडीयाव्दारे सर्वांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत वनरक्षक कृष्णात दळवी यांना विचारले असता ते म्हणाले, मंगळवारी रात्री दहा वाजता सादळे येथील शतकरऱ्यांनी बिबट्या सदृश प्राणी दिसल्याचे वनरक्षक एस.एस.हजारेंना सांगितले होते.तर बुधवारी शिये येथील काही ग्रामस्थांना आढळला. याबाबत गुरुवारी शिये, जठारवाडी डोंगर परिसराची पाहणी करणार असल्याचे सांगितले.
………………………………………………………………………………


previous post