Tarun Bharat

सादळे-मादळे घाटात बीएमडब्ल्यू मोटारीने घेतला पेट

पुलाची शिरोली / वार्ताहर

दुरुस्तीचे काम करुन ट्रायलसाठी सादळे-मादळे घाटात नेलेल्या बीएमडब्ल्यू मोटारीने पेट घेतला. प्रसंगावधान दाखवत चालकाने चालू मोटारीतून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. मोटार मात्र जळून खाक झाली. यामध्ये मोटारीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहीती अशी की, सलीम अहमद ( रा. गोवा ) यांच्या बीएमडब्ल्यू मोटारीची (एमएच १२ बीएक्स ४५४५ ) ईबीएस सिस्टिम काम करत नव्हती म्हणुन त्यांनी पुलाची शिरोली येथील माळवडी येथे समीर मिस्त्री ( वय ३० ) यांचेकडे दुरुस्तीला सोडली होती. काल रात्री अकरा वाजता मोटारीचे काम करून मिस्त्री यांनी ट्रायलसाठी ही मोटार सादळे-मादळे घाटात नेली. परत येताना ब्रेक लागले नाहीत म्हणुन मिस्त्रीने खाली उडी मारली. आणि मोटार पूढे जाऊन दगडाला धडकली. या धडकेत मोटारीने अचानक पेट घेतला. बघता बघता मोटार जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

एवढ्या रात्री सादळे-मादळे घाटात ट्रायल घेणे आवश्यक होते का? तसेच अचानक पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी याबाबत पोलिसांत तक्रार का झाली नाही? असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत.

Related Stories

राशिवडे येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात सहापर्यंत 458 पॉझिटिव्ह, 11 जणांचा कोरोनाने बळी

Archana Banage

कोल्हापूर : मायक्रो फायनान्सच्या तक्रारींसाठी ‘या’ क्रमांकावर संपर्क करा – जिल्हाधिकारी

Archana Banage

कोल्हापूर : आरोग्य यंत्रणा हतलब, रूग्ण बेदखल

Archana Banage

आरळे येथे चार लाखाचे तांब्याचे स्क्रॅप चोरीला

Abhijeet Khandekar

गांधीनगर परिसरात गोवा बनावटीच्या, गावठी दारूची राजरोसपणे विक्री; बेटिंग, मोठ्या चोऱ्यांत वाढ, गांधीनगर पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा

Archana Banage