Tarun Bharat

साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने सर्वसामान्य आर्थिक अडचणींमध्ये सापडले आहेत. त्यामुळे यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून शिल्लक राहिलेली रक्कम समाजोपयोगी उपक्रमासाठी खर्च करण्याचा निर्णय टिळकवाडी येथील सोमवार व मंगळवार पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शशिकांत खासबाग होते.

मुंबई, पुण्यानंतर सर्वाधिक जल्लोष व उत्साहात बेळगावमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवषी लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प असल्याने आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे या काळात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे.

इतर मंडळांनीही करावे अनुकरण

दरवषी धुमधडाक्मयात गणेशोत्सव साजरा होत असतो. परंतु यावर्षी अवास्तव खर्च कमी करून तोच पैसा गरजवंतांसाठी खर्च करण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. यामुळे विधायक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. त्यामुळे अशाचप्रकारे इतर मंडळांनीही अनुकरण करण्याचे आवाहन कार्यकारिणीने केले आहे.

यावेळी मंडळाचे सल्लागार किरण गावडे, सचिन हंगिरगेकर, राजू नाईक, राजू वर्पे, किरण गवळी, निलेश बागी यासह इतर उपस्थित होते..

Related Stories

…अन्यथा कर्नाटक केंद्रशासित राज्य म्हणून घोषित करावे

prashant_c

वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी प्रचंड गर्दी

Patil_p

सुगी हंगामाला काही भागात जोर

Amit Kulkarni

शाळांचा परिसर हिरवाईने नटणार

Patil_p

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

Omkar B

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा नको

Patil_p