Tarun Bharat

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया ओपन खेळासाठी गेलेल्या सानियाने 2022 चा हंगाम तिच्यासाठी शेवटचा हंगाम असल्याचे म्हटले आहे.

सानिया म्हणाली, मी ठरवले आहे की, हा माझा शेवटचा सीझन असेल. मी एक-एक आठवडा खेळत आहे. मी संपूर्ण हंगामात खेळू शकेन की नाही हे माहित नाही, पण मला संपूर्ण हंगामात राहायचे आहे.

ऑस्ट्रेलिया ओपनमधून पराभूत झाल्यानंतर सानियाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया आणि तिची युपेनची जोडीदार नादिया किचनोक यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांचा सामना स्लोव्हानियाच्या तमारा झिदानसेक आणि काजा जुवान या जोडीशी झाला. स्लोव्हानियाच्या या जोडीने सानिया-नादियाचा एक तास 37 मिनिटांत 4-6, 6-7 (5) असा पराभव केला. सानिया आता या ग्रँडस्लॅमच्या मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसह सहभागी होणार आहे.

सानिया मागच्या 19 वर्षांपासून टेनिस खेळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताला विजय मिळवून दिला आहे. महिला डबल्समध्ये 2016 ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचा किताब जिंकला. तर मिक्स डबल्समध्ये तिने 2009 ऑस्ट्रेलियन ओपनर, 2012 फ्रेंच ओपन आणि 2014 यूएस ओपनमध्ये तिने ट्रॉफी पटकावली आहे.

Related Stories

विनायक मेटे यांच्यावर उद्या संध्याकाळी बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Abhijeet Khandekar

रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्यक्ष

datta jadhav

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 646 डॉक्टरांचा मृत्यू; IMA ने दिली माहिती

Tousif Mujawar

वाझेंना कोठडी, आणखी तीन अधिकारी ताब्यात

Patil_p

‘त्या’ प्रकरणी चौकशी आयोगासमोर शरद पवारांनी नोंदवली साक्ष

Archana Banage

न्यूझीलंड महिला संघाचा भारतावर सलग दुसरा विजय

Patil_p