Tarun Bharat

सान्या मल्होत्राला मिळाला ‘हिट’ चित्रपट

दंगल आणि बधाई हो यासारख्या चित्रपटांमधून दिसून आलेली अभिनेत्री सान्या मल्होत्राला एक मोठा चित्रपट मिळाला आहे. अभिनेत्रीने अलिकडेच दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘हिट’च्या हिंदी रिमेकसाठी करार केला आहे. या चित्रपटातील  मुख्य भूमिकेसाठी राजकुमार रावची निवड करण्यात आली आहे. तेलगू भाषेतील मूळ हिट चित्रपट शैलैश कोनालु यांनी दिग्दर्शित केला होता.

सान्याने सोशल मीडियारवून चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील असल्याची माहिती दिली आहे. हिटच्या टीममध्ये सामील होऊन अत्यंत आनंदी असल्याचे तिने म्हटले आहे. हिंदी रिमेक चित्रपट टी-सीरिज आणि दिल राजू यांच्याकडून तयार केला जात आहे.

तेलगू भाषेतील हिट चित्रपट पाहिला असून त्याची संकल्पना अत्यंत आवडली आहे. एक अत्यंत रंजक पटकथा असलेला हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहायला हवा. राजकुमारसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे सान्याने म्हटले आहे.

Related Stories

ललित प्रभाकर झळकणार टर्रीमध्ये

Patil_p

‘अकेली’मध्ये नुसरत भरुचा

Patil_p

स्वप्नील सोबत रोज रात्री घडतो हा प्रकार…

Patil_p

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालांची गोळ्या झाडून हत्या

Archana Banage

अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

समांतर 2 चे चित्रीकरण सुरु

Patil_p