Tarun Bharat

साबरीकडे पहिले डब्ल्यूबीसी जेतेपद

वृत्तसंस्था/ हैदराबाद

चेन्नईच्या साबरी जे. हा वर्ल्ड बॉक्सिंग कौन्सिल, इंडियाचा पहिला विजेता बनला आहे. येथे झालेल्या वेल्टरवेट लढतीत त्याने चंदिगडच्या अनुभवी आकाशदीप सिंगचा आठ फेऱयांच्या लढतीत पराभव करून हा मान मिळविला.

या व्यावसायिक लढतीसाठी नियुक्त केलेल्या तीनही ज्युरींनी साबरीच्या बाजूने 76-76, 79-73, 79-73 अशा गुणांनी कौल दिला. इंडियन आर्ट रिव्होल्युशनच्या राजा प्रशांत सिंग या प्रमोटरनी ही ‘हेल्स बे’ लढत येथील गच्चीबोली स्टेडियमवर सोमवारी रात्री आयोजित केली होती. डब्ल्यूबीसी आशियाई रौप्य लाईटवेटच्या आठ फेऱयांच्या चुरशीच्या लढतीत कार्तिक सतीश कुमारने इंडोनेशियाच्या हिरो टिटोचा 80-72, 79-73, 79-73 अशा गुणांनी पराभव करून पदक पटकावले.

साबरीने डब्ल्यूबीसीचे पहिले जेतेपद मिळविले असल्याने त्याला आता आपले जेतेपद राखण्यासाठी भारतातील अन्य बॉक्सर्सविरुद्ध ठरावीक अंतराने लढावे लागणार आहे. 24 वर्षीय साबरीने याआधी पाच लढती खेळल्या असून त्यापैकी 4 जिंकल्या आहेत तर एका लढतीत तो पराभूत झाला होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्याने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश केला. 27 वर्षीय आकाशदीप सिंगने या लढतीत उतरण्याआधी गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत विक्रमी आठ लढती जिंकल्या तर एक लढत गमविली आहे. मात्र अननुभवी साबरीसमोर त्याला यश मिळविता आले नाही.

Related Stories

भारत-जपान आज चुरशीची हॉकी उपांत्य लढत

Patil_p

6 क्रिकेटपटू फिटनेस चाचणीत अपयशी

Patil_p

केन विल्यम्सन मायदेशी रवाना

Patil_p

बाद फेरी गाठणारा ब्राझील दुसरा संघ

Patil_p

इंग्लंडविरुद्ध मालिकेतून शुभमन गिल बाहेर?

Amit Kulkarni

आनंदची यांगईविरुद्ध बरोबरी

Patil_p