तरुण भारत

साबालेन्का उपांत्य फेरीत, स्वायटेकची आगेकूच

वृत्तसंस्था/ रोम (इटली)

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या इगा स्वायटेकने आपली विजयी घोडदौड कायम राखत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना बेलारूसच्या अझारेंकाचा पराभव केला. आर्यना साबालेन्काने मात्र उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

Advertisements

गुरूवारी झालेल्या सामन्यात स्वायटेकने अझारेंकाचा 6-4, 6-1 असा फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले हा सामना जवळपास दोन तास चालला होता. 20 वर्षीय स्वायटेकचा अलिकडच्या कालावधीतील हा सलग 25 वा विजय आहे. तिने 2022 च्या टेनिस हंगामात सलग पाच स्पर्धा जिंकल्या आहेत. चालू महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

दुसऱया एका सामन्यात तृतीय मानांकित साबालेन्काने अमेरिकेच्या ऍनीसिमोव्हाचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. उपांत्य फेरीत तिची लढत स्वायटेकशी होण्याची शक्यता आहे.

Related Stories

भारताचा चीनवर मोठा विजय

Patil_p

आयओसी अध्यक्ष बाक यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे आभार

Patil_p

आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून

Patil_p

पहिल्या बिटकॉईन बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसन विजेता

Amit Kulkarni

भारताचा महिला रिकर्व्ह संघ अंतिम फेरीत

Patil_p

पीव्ही सिंधू, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!