Tarun Bharat

सामनाने निरपेक्षपणे लिहणं बंद केलं – चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम/तरुण भारत

भाजपचा ४२ वा वर्धापन दिन देशभरात साजरा केला जात आहे. राजकीय नेते यानिमित्ताने भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आज कोल्हापुरातही भाजपच्या स्थापना दिनानिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (mahavikas aghadi) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार निशाणा साधला.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाचाही समाचार घेतला. ते म्हणाले, सामनाने निरपेक्षपणे लिहिणं बंद केलं आहे. त्यावेळीपासून सामना बिघडला आहे. त्यामुळे सामनामध्ये काय येत हे मी वाचायचं बंद केलं आहे.

मंगळवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची ईडीने (ED) दोन ठिकाणची मालमत्ता जप्त केली. यांनतर राऊत यांनी ही संपत्ती कष्टाने मिळवली असल्याचे म्हणत किरीट सोमय्यांवर जोरदार निशाणा साधला होता. यावर बोलताना पाटील म्हणाले, किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर जे आरोप करत आहेत त्याचा तपास करण्यासाठी संजय राऊत यांच्याकडे अनेक तपास यंत्रणा आहेत, त्यांनी त्या तपास यंत्रणांचा वापर करून सोमय्यांचाही तपास करावा असे आव्हान केले. तसेच संजय राऊत जे काही आरोप करत आहेत त्या आरोपांना मी उत्तर देणार नाही, त्यांनाच जाऊन विचार ते काय आरोप करत आहेत, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी जाहीर केलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण होतोय. ते मुख्यमंत्री नसताना या महामार्गाचं उद्घाटन होत असल्याची सल देवेंद्र फडणवीसांच्या मनात असून त्यांनी ती बोलून दाखवली आहे. या महामार्गाच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांना न बोलवण्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना पाटील यांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनला देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं नाही त्यामुळे हे कदरु मनाचं सरकार आहे, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetty) यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत महाविकास आघाडीमधून स्वाभिमानी बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. यावर चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी राजू शेट्टी यांना आपल्यासोबत घेण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते करू, असे ते यावेळी म्हणाले.

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

धरणात बुडालेल्या डॉक्टरांना बाहेर काढताना कोल्हापुरचा जवान बुडाला ; बीडमधील घटना

Archana Banage

इचलकरंजी येथील जवाहरनगरात चोरट्यांनी बंद घर फोडले

Archana Banage

मुख्यमंत्री बोम्माई असंतुष्ट मंत्र्यांना शांत करण्यासाठी भाजप हायकमांडची घेणार मदत

Archana Banage

मुस्लिम धर्मगुरुंच्या अंत्ययात्रेला जमले 20 हजार लोक

datta jadhav

मांगेवाडीजवळ ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडून चालक ठार

Abhijeet Khandekar