वार्ताहर/ किणये
दुर्गम भागातील नागरिकांच्या मदतीसाठी वन टच फाऊंडेशन ही संस्था धावून गेली आहे .कणकुंबी परिसरातील गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्य देऊन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कणकुंबी भागातील अतिशय घनदाट जंगलात वसलेल्या बेटणे ,गवळीवाडा, पारवाड, या दुर्गम गावामधे जावून जिवनावश्यक आहारधान्य साहित्य, व कपडे, वाटप करण्यात आले. या कोरोना महामारीत आजपर्यंत या ठिकाणी कोणत्याही राजकीय पुढा-यानी, वा सामाजिक संस्थेनी, कोणतीच मदत पोचवली नव्हती .वा दखल सुद्धा घेतली नव्हती. तिथे “वन टच फाऊंडेशन” बेळगाव. या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेने मदत पोचवली, आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सामाजिक संस्थेच हे कार्य पाहून तेथील लोक भारावून गेले, अनेकांच्या चेहऱयावर आनंद द्विगुणित झाला. संस्थेचे कार्य पाहून तेथील लोकांच्या तोंडून कौतुक करण्यात येत होते.
तसेच आमगाव येथील 14 कुटुंबांना सुद्धा जिवनावश्यक आहारधान्य साहित्य देण्यात आले. या कार्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विठ्ठल फोंडू पाटील, संतोष गंधवाले, मनोहर बुक्मयाळकर , जय प्रकाश बेळगावकर, रमेश सुतार, ज्योतेश हुरूडे, टी.डी.पाटील .सुप्रिता शेट्टी, प्रणिता गुरव, धनश्री पाटील, संतोष डोण्यान्नावर, शांतीलाल पटेल, अरूण चौगुले, या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. हे सर्व जिवनावश्यक साहित्य .उदय अष्टेकर .विश्रांती अष्टेकर या दानशूर व्यक्तींकडून एकूण 60 कुटुंबांना किमान 15 दिवस पुरेल, इतक आहारधान्य साहित्य वन टच फाऊंडेशन संस्थेला मदत म्हणून देण्यात आले होते. हे साहित्य निस्वार्थपणे वन टच फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या डोंगर भागात जाऊन तेथील गरजू लोकांपर्यंत या संस्थेने पोहोचवले.