Tarun Bharat

सायकल रॅलीद्वारे बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते सायकल रॅलीचा शुभारंभ
पुणे / प्रतिनिधी  : 
बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेंतर्गत तसेच बालहक्क संरक्षण  व सुरक्षिततेनिमित्त बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आज पुणे ते कन्याकुमारी सायकल जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. व्हाईब्रेट एचआर प्रोफेशनल असोसिएशन,पुणे व कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राम यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कामगार उप आयुक्त विकास पणवेलकर, सहायक कामगार आयुक्त अजिनाथ खरात, सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप, सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके, सहायक कामगार आयुक्त समीर चव्हाण, सहायक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत, सहायक कामगार आयुक्त मुजमिल मुजावर, सहायक कामगार आयुक्त अभय गीते ,गजानन बोरसे, कामगार अधिकारी दत्तात्रय पवार, कामगार अधिकारी  श्रीकांत चोभे, कामगार अधिकारी तरन्नुम अत्तार, कामगार अधिकारी प्राजक्ता गुरव, व्हाईब्रेट एचआर प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष शंकर साळुंखे यांच्यासह एचआर विभागातील सहभागी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 पुणे ते कन्याकुमारी असा या सायकल रॅलीचा एकूण 11 दिवसाचा प्रवास असून एकूण 51 युवकांनी या रॅलीत सहभाग घेतला आहे. दिवसाला 150 किमी अंतर पार करून मुक्कामाच्या ठिकाणी बालकामगार जनजागृतीसोबतच सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, बेटी बचाव, बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती आदी सामाजिक विषयावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे कामगार उप आयुक्त पणवेलकर व व्हाईब्रेट एचआर प्रोफेशनल असोसिएशनचे अध्यक्ष साळुंखे यांनी सांगितले.

Related Stories

अक्कलकोटच्या खाकी वर्दीने वाचवले पाच अपघातग्रस्तांचे प्राण

Abhijeet Khandekar

करमाळा शहरात आज एकही पॉझिटिव्ह नाही

Archana Banage

बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी 13.10 कोटींच्या निधीला तत्वता मान्यता

Archana Banage

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना करावी लागणार चार महिन्यांची प्रतिक्षा

Archana Banage

पंढरपूरच्या माघी वारीवर गंडांतर,दशमी आणि एकादशीला विठ्ठल दर्शनास बंदी

Archana Banage

सोलापूर : दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे निधन

Archana Banage