Tarun Bharat

सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत

 ऑनलाईन टीम / मुंबई :

सायन आणि माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी ही घटना घडली.

सकाळी ऐन गर्दीच्या काळातच रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. घाटकोपर, कुर्ला, ठाणे आणि विक्रोळी स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत तातडीने रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्याने लोकल 15-20 मिनिटे उशीरा धावत आहेत. काही वेळातच ही सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट

datta jadhav

“हिरेन हत्येचे पुरावे नष्ट करण्याचं राज्य सरकारचं षडयंत्र”

Archana Banage

महाराष्ट्रात 24 तासात 77 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा; दोघांचा मृत्यू

Tousif Mujawar

‘सन्नाटा’ झाला शांत ; अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

Archana Banage

राज्यात पुराचं संकट त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये ; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Archana Banage

महाविकासने कौर्याच्या सीमा ओलांडल्या; राणांच्या भेटीनंतर फडणवीसांचा हल्लाबोल

Rahul Gadkar