Tarun Bharat

सायबर गुन्हे – धोके व सुरक्षा

तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन 2021 पर्यंत भारतातील 72 कोटीपेक्षा जास्त लोक मोबाईल व त्याद्वारे इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे.

सध्या ऑनलाइन व्यवहारातील 70 टक्के व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु टय़ूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. तसेच किंवा बँकेचे व्यवहार करणारी व्यक्ती ही आपली माहिती इंटरनेटद्वारे आदान प्रदान करत असते. त्यालाच आपण डेटा म्हणतो.

आपण साध्या साध्या ऍप किंवा वेबसाईटवरून आपली खाजगी माहिती जाहीर करीत असतो. यातून आपल्याबद्दलची बारीकसारीक माहिती एकत्र करून त्याचे पटकन पृथक्करण करून एक रिपोर्ट तयार करता येतो जो प्रामुख्याने मार्केटिंगसाठी वापरण्यात येतो. यातील प्रत्येक माहितीची गरज असतेच असे नाही. याचा सदुपयोग करणारे लोक जसे आहेत तसाच दुरुपयोग करणारे लोक आहेत. त्याचा आपल्याला मोठा आर्थिक व सामाजिक फटका बसण्याची शक्मयता असल्याने, याबाबत सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे.

आपल्याला जर काळाबरोबर राहायचे असेल तर आपण तंत्रज्ञान टाळू शकत नाही. अनेकदा नव्हे प्रत्येकवेळी आपणच ही माहिती कळत नकळत जाहीर करत असतो. तेव्हा ही माहिती सुरक्षित कशी ठेवावी याची माहितीही आपल्याला असणे आवश्यक आहे.

 विविध सोशल मीडियाचा वापर करीत असताना, कोणते माध्यम का व कशासाठी वापरत आहोत, काय योग्य-अयोग्य याचे भान ठेवणे व ते वापरताना कोणत्या गोष्टी कराव्यात व टाळाव्यात हे समजणेही आवश्यक आहे. आपण पोस्ट करीत असलेल्या माहितीचा दुरूपयोग करता येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, तसेच यदाकदाचित दुरुपयोग झालाच तर, काय उपाययोजना करावी हे माहिती असणे गरजेचे आहे. थोडक्मयात आपली खाजगी माहिती सुरक्षित कशी ठेवावी? वयात येणारी मुले, मुली, महिला यांनी कोणती विशेष काळजी घ्यावी अशा अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत.   

ज्या गोष्टीसाठी इंटरनेटची आवश्यकता आहे अशा सर्व गोष्टी या ‘सायबर’ या सदराखाली येतात. त्यामधील आपल्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता म्हणजे ‘सायबर सुरक्षा’. 

आपली माहिती हॅकर्स अत्यंत चलाखपणे मिळवितात. आपले सायबर संबंधित कोणतेही खाते योग्य लॉग-इन आयडी व पासवर्ड टाकूनही किंवा पासवर्ड विसरल्यास तो नव्याने मिळवता येत नसल्यास नक्की समजावे की आपले खाते हॅक झाले आहे. आपली सर्वच खाती ई मेलशी संलग्न असल्याने सायबर चोर सर्वप्रथम आपल्या मेलशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आपण इतर ठिकाणी दिलेले पासवर्ड हॅकर्सच्या हातात आयतेच मिळतात. 

इंटरनेट बँकिंग करणाऱयांनी बँकेस वेगळा मोबाईल नंबर आणि वेगळा मेल द्यावा. तो कोणासही शेअर करू नये. नेट बँकिंग करताना स्क्रीनवरील कीबोर्ड (व्हर्च्युअल) वापरावा. पासवर्ड सहज अंदाजाने ओळखता येणार नाही असा पण आपल्याला सहज लक्षात राहील असा ठेवा.

आपल्याला आलेली फाईल/लिंक वापरण्यास योग्य आहे का ते येथून तपासून पहा. संकेतस्थळ सुरक्षित आहे की नाही हे आपण येथे जाऊन तपासू शकतो. तुमच्या परवानगीशिवाय तुमची कोणतीही गोष्ट जसे-टेक्सपोस्ट, फोटो, व्हिडीओ कोणीही प्रकाशित करू शकत नाही. जर तसे केल्यास आपण नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी.

सार्वजनिक वाय-फाय (रेल्वे स्टेशन, हॉटेल, मॉल) तात्पुरते जॅम करून अल्पावधीत तशाच प्रकारचे आपले स्वतंत्र नेटवर्क निर्माण करून (श्aह द स्ग्ddत attaम्क्) आपली माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळे आपण नक्की कोणते नेटवर्क वापरतोय तेच नेमके समजत नाही. तेव्हा यावर उपाय हाच, की अशाप्रकारचे फ्री वाय-फायचा वापर अजिबात करू नये. स्वतःचा कॉम्प्युटर/मोबाइल स्वतःचे नेट वापरावे. दुसऱयाचा कॉम्प्युटर/मोबाईल वापरून आपले कोणतेही व्यवहार करू नयेत. यामध्ये आधीच इन्स्टॉल केलेल्या काही प्रोग्रामद्वारे आपली महत्त्वाची माहिती युजरनेम/पासवर्ड चोरीस जाऊ शकतो.

तंत्रज्ञानामुळे जनरेशन गॅप खूप वाढली आहे. वयात येणारी मुले/मुली आपले खाजगी फोटो शेअर करू शकतात. शेअर करत नसतील तर उत्तमच आहे मात्र यावर फाजील विश्वास न ठेवता लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुलांशी मनमोकळेपणाने बोला, जेणेकरून ते कोणत्याही गोष्टी आपल्यापासून लपवणार नाहीत किंवा चूक झाल्यास स्वतःहून कबुली देतील. अनोळखी लोकांच्या, सोशल मित्र असलेल्या व्यक्तीच्या मैत्री विनंत्या मान्य करू नयेत. ही गोष्ट विशेषतः किशोरवस्थेत असणाऱया वयात आलेल्या मुलामुलींनी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.

18 वर्षाखालील मुले मुली विशेषतः वयात आलेल्या मुली काय करतात ते पाहण्यासाठी, चाईल्ड केअर ऍप किंवा गुगल मॉनिटरिंगचा वापर करून त्यावर लक्ष ठेवू शकतो. तोकडे कपडे, उघडे अंग असलेले फोटो प्रसारित करणे ही आजकाल फॅशन झाली आहे. असे करणार असाल तर, त्याचे होणारे परिणाम स्वीकारण्याची आपली तयारी असली पाहिजे. शक्मयतो अशा प्रकारची कृती करू नये. यामुळे आपली सोशल इमेज खराब होते व भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागते.

आपला मोबाइल, लॅपटॉप, डेस्क टॉप विश्वासाने कोणासही देऊ नये. मोठय़ा प्रमाणात गैरवापर होण्याची शक्मयता जास्त असते.  पोलिसांकडे सायबर गुन्हय़ाची तक्रार नोंदवताना मुद्देसूद (पंचनाम्यात जेवढी माहिती आवश्यक असते त्याप्रमाणे) आणि स्क्रीनशॉट पुराव्यांसहीत नोंदवावी.

न मागता कोणी आपल्याला मदत करत असेल, तर त्याचा गुन्हेगारी हेतू असण्याची शक्मयता असते.

जेव्हा आपल्याला सिस्टीमकडून पासवर्ड जतन किंवा बदल करायचा आहे अशी विचारणा झाली, तर त्यास नकार द्यावा.

घ् aस् हदू rदंद, म्aज्tम्प्a या सारख्या योजना, या व्यक्तीने स्वतःहून विनंती केली आहे, याची खात्री करून घेण्यासाठी असतात.

या सर्व गोष्टी तंतोतंत अमलात आणणे जरी कठीण असले तरी अशक्मय नाही. तेव्हा दुसऱयावर आपला 100 टक्के विश्वास आहे असे त्याला भासवून, त्याच्यावर विश्वास न ठेवायची कला आता आपल्याला शिकून घेणे गरजेचे आहे.

विनायक राजाध्यक्ष

Related Stories

सुशील की कुशील…?

Patil_p

मर्मज्ञांचे विस्मरण होत असल्यामुळे…

Patil_p

यात्रांची मात्रा लागू पडणार का?

Amit Kulkarni

समारोपाचे शब्द

Patil_p

करुणावतार चैतन्य महाप्रभु

Patil_p

मिथ्या गोष्टी अज्ञानामुळे मनुष्याला खऱया वाटतात

Patil_p