Tarun Bharat

सारमानस येथे फेरीबोटीतून वृध्द मांडवीत कोसळला

धक्क्याजवळ पोहोचतानाच नदीत पडल्याने खळबळ

        डिचोली/प्रतिनिधी

  पिळगाव पंचायत क्षेत्रातील सारमानस येथे फेरीधक्क्यावर फेरबोट फेरीधक्क्याला लागणारच इतक्मयात एक वृद्ध फेरीबोटीतून थेट पाण्यात पडण्याची घटना घडली. हि घटना काल शनि. दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री 7.15 वा. च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांची दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री मृतदेह हाती लागला नव्हता.

   उपलब्ध माहितीनुसार अडकोण बाणस्तारी येथील नामदेव फडते हे वृध्द अन्य एका साथीदारासह मयेतील एका मठात वाचनासाठी येत होते. “चांदोर” नामक फेरीबोटीत ते सांत ईस्तेव येथे दुचाकीसह चढले होते. फेरीबोट सारमानस येथील फेरीधक्क्यावर पोहोचण्यास सुमारे 25 मीटर अंतरावर असतानाच सदर नामदेव फडते हे अचानक फेरीबोटीतून थेट मांडवी नदीत कोसळले. त्यावेळी अंधार पडल्याने सदर बाब सर्वांच्याच लक्षात आला नाही. परंतू काहीं?च्या लक्षात येताच त्यांनी फेरीबोटमधील कर्मचाऱयांना माहिती दाली. तसेच त्या वृध्दाचा साथीदारही त्याला शोधू लागला.

  या घटनेची माहिती डिचोली अग्निशामक दलाला देण्यात आली असता दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि लागलीच त्यांनी शोधकार्याला.प्रारंभ केला. फेरीबोटीच्या सहाय्याने त्यांनी फेरीधक्क्याच्या परिसरात तसेच काठांवर शोध घेतला. पण मृतदेह काही त्यांच्या हाती लागला नाही. रात्री उशिरा अग्निशामक दलाने शोधकार्य थांबविले.

Related Stories

भाजप सरकारचे अल्पसंख्यांकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

युथ ऑफ खांडोळा पुढील फेरीत

Amit Kulkarni

पुढील गणेश चतुर्थीपूर्वी प्रतिमूर्ती अडीचशे रु. अनुदान

Amit Kulkarni

बिगरगोमंतकीयांना सशुल्क विलगीकरणाची सक्ती करा

Omkar B

भाजपासमर्थकांच्या सहकार्याने रमाकांत बोरकर सांकवाळच्या सरपंचपदी

Patil_p

जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटचे पाणी वाया

Amit Kulkarni