Tarun Bharat

सारस्वत चैतन्य गौरव सोहळा रविवारी

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

  सारस्वत प्रकाशन संस्थेतर्फे प्रतिवर्षी सारस्वत चैतन्य गौरव सोहळय़ाचे आयोजन केले जाते. मुंबई, पुणे, डोंबिवली, कुडाळनंतर यंदा सारस्वत विकास मंडळ आणि सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह यांच्या सहकार्याने कोल्हापुरात हा सोहळा आयोजित केला आहे. रविवार 9 रोजी सकाळी साडेदहा वाजता सीपीआर चौक परिसरातील दिगंबर जैन बोर्डिंग हॉलमध्ये सोहळा होणार असल्याची माहिती सारस्वत प्रकाशनचे विश्वस्त प्रमोद तेंडूलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   तेंडूलकर म्हणाले, सारस्वत प्रकाशन संस्थेतर्फे मुंबई येथून गेली 34 वर्ष सारस्वत चैतन्य त्रैमासिक प्रसिद्ध होत आहे. 2001 सालापासून सारस्वत चैतन्य गौरव सोहळा आयोजित केला जात आहे. यंदा हा सोहळा कोल्हापुरमध्ये होणार आहे. सोहळय़ामध्ये कर्तृत्वान सारस्वतांना मान्यवरांच्या हस्ते सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे. सोहळय़ास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहूणे म्हणून तर सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

  सोहळय़ास एसव्हीसी, एनकेजीएसबी बँकेचे अध्यक्ष, सारस्वत समाजातील मान्यवर, अनेक सारस्वत संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी समाज बांधवांनी सोहळय़ास उपस्थित रहावे, असे आवाहन सारस्वत प्रकाशन संस्थेचे कार्यवाह राहुल साखळकर यांनी केले.

  पत्रकार परिषदेला सारस्वत बार्डिंगचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर, सचिव सुधीर कुलकर्णी, सारस्वत विकास मंडळचे अध्यक्ष संजीव बोरकर, उपाध्यक्ष सचिन जनवाडकर, सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

  सारस्वत चैतन्य गौरव पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे

  ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र शिरगांवकर (सारस्वत प्रकाशन पुरस्कार), स्त्री रोग, प्रसूती तज्ञ व संशोधक डॉ. सतीश पत्की (कै. रवींद्र पाटकर स्मृती पुरस्कार), समाजशास्त्र तज्ञ व संशोधक डॉ. अनुराधा सामंत (कै. प्रमादिनी व कै. डॉ प्रभाकर वा. रेगे स्मृती पुरस्कार), न्यूरोलॉजी तज्ञ व स्पायनल सर्जन डॉ. संतोष प्रभू  (कै. एम. एन. देसाई स्मृती पुरस्कार), ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू (कै.गोविंद मंगश लाड स्मृती पुरस्कार), सारस्वत विकास मंडळ (समाजसेवक कै. व्ही. डी. पाडगांवकर स्मृती पुरस्कार), अनुराधा तेंडुलकर (सारस्वत प्रकाशन विशेष सत्कार)  कु. कृपा नायक (कै. एन. व्ही. गुंजीकर स्मृती सारस्वत चैतन्य विशेष गुणवत्ता पारितोषिक)

Related Stories

इचलकरंजीच्या महावितरण विभागीय कार्यालयात तोडफोड

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात 998 पॉझिटिव्ह, 21 बळी

Archana Banage

Kolhapur : धामणनेच धामण सापाला खाल्ले.. देशातील पहिलीच घटना असल्याचा दावा

Abhijeet Khandekar

पट्टणकोडोली यात्रेत पाळणा घसरला, पाच जण जखमी

Archana Banage

भाजप-ताराराणीचे स्टेअरिंग महाडिकांच्या हातात!

Archana Banage

भुये येथे ग्रामीणस्तरीय क्रांतिकारक फुटबॉल लीग स्पर्धा

Archana Banage
error: Content is protected !!