Tarun Bharat

सारी व कोविडबाधित ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा फलटण येथील सारी व कोविड बाधित ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

१०१ नागरिकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड यांच्याकडून १०१ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण ८४४ झाली असून कोरोनातून बरे झालेल्या ६६८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या १३७ इतकी झाली आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे मृत्यूपश्चात चाचणी करायची नसल्यामुळे कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दि. १९ जून रोजी मृत्यू झालेला.मृत्यूपश्चात बाधित निघाला होता. तो बाधित मृत्यू मधून कमी केल्यामुळे आता बाधित मृत्यूची संख्या ३९ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गडीकर यांनी दिली.

Related Stories

जागतिक बुद्धिबळदिनानिमित्त सांगलीमधून विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

Archana Banage

यड्रावच्या पार्वती औद्योगिक मध्ये अनेक उद्योग धंदे सुरू; शासनाच्या नियमांना हरताळ

Archana Banage

जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

datta jadhav

पेगासस कांड महाराष्ट्रात ही झाले का? , राज्य सरकारने चौकशी करावी – सचिन सावंत

Archana Banage

पुण्यात आज आणखी दोघांचा मृत्यू

prashant_c

सामर्थ्य सोशल फौंडेशन समाजोपयोगी कार्य करेल

Patil_p
error: Content is protected !!