Tarun Bharat

सारे काही मानसिक स्वास्थ्यासाठी

शारीरिक स्वास्थ्य हे बऱयाचदा मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. जेव्हा मनावर ताण येतो, विचाराने मन गढून जाते तेव्हा शरीर फार थकते. त्यातून शारीरिक आजारही जडतात. यासाठी मन निवांत ठेवावे. याचे स्वास्थ्य जपणे फार आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य ठीक राहिल्यास मनुष्याचा चेहरा आनंदी दिसतो. चिरतरुण वाटतो. स्वास्थ्य जपणे थोडे कठीण असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. यासाठी आपण केवळ खालील काही उपाय करून पाहण्यास काय हरकत आहे?

1) दुसऱयांच्या भानगडीत    नाक खूपसू नका.

अनेकदा आपण दुसऱयांच्या भानगडीत वरचेवर नाक खुपसून स्वत:च गोत्यात येत असतो. अर्थात याला कारण असते “माझा मार्गच बरोबर आहे, माझ्या विचाराची दिशाच योग्य आहे आणि जे याच्याशी सहमत नाहीत, त्यांच्या गळी आपले म्हणणे कसेही करून उतरवले पाहिजे,’’ ही विचारसरणी. ही विचारसरणी दुसऱया व्यक्तीचे अस्तित्वच अमान्य करते, तसेच देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देते.

2) क्षमा करा- विसरून जा !

मन:शांती मिळविण्याचे हे खूप प्रभावी तत्व आहे. आपला अपमान करणाऱया वा आपल्याला दुखविणाऱया व्यक्तीचा आपण आतून राग राग करीत राहतो, सूडभावना जोपासतो. यातूनच मग निद्रानाश, पोटाचे विकार, अति-रक्तदाब असे विकार जडतात. आपला अपमान तर एकदाच झालेला असतो पण सूडभावना धगधगत मात्र कायम राहते. सूडभावना सोडा.

3) स्तुतीपूजक बनू नका !

जगात सगळीकडे नुसता स्वार्थ भरलेला आहे.  आज तुमची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संधी मिळताच तुमच्यावर चिखलफेक करतील.  तुमच्या भोवती दिवे ओवाळणाऱयांना जराही महत्व देवू नका. तुमचे काम नीतीची चाड न सोडता आणि प्रामाणिकपणे करीत रहा.

4) द्वेष करू नका !

द्वेष करणाऱयामुळे मनाची शांती कशी बिघडते, याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेल.    विधीलिखीत टळू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही किंवा त्यापासून कोणी पळू शकत नाही. तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नाही त्याला दूसऱयाला दोष देण्यात काय हशील ? द्वेष करून काहीही साध्य होणार नाही, उलट त्या आगीत तुमच्या मनाची शांतीच राख होवून जाईल.

5) प्रवाहाबरोबर चला.

तुम्ही एकटे प्रवाहाच्या वि रुद्ध दिशेने नक्कीच जाऊ शकणार नाही. यात बुडायची शक्मयताच जास्त. त्यापेक्षा प्रवाहाबरोबर गेल्यास तुम्हाला अकस्मात प्रवाहाबरोबर जुळवून घेता घेताच आगळय़ा एकात्मतेची प्रचीती येईल.

6) संकटांचा धैर्याने

     मुकाबला करा.

प्रत्येक अपयश ही पुढील यशाची पायरी असते. दर दिवशी आपण अनेक अडथळय़ांचा, व्याधींचा, उदेकाचा, अपघातांचा सामना करीतच असतो.  या सगळय़ांना खंबीरपणे तोंड द्या. संकटांसमोर शरणागती पत्करून उमेद जगण्याची हरवून बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. धैर्य, आंतरीक शक्ती आणि दांडगी इच्छाशक्तीच तुम्हाला विजयाप्रत नेईल.

7) अंथरूण पाहून

   हातपाय पसरा

भौतिकसुखाच्या मागे लागल्यास मन:शांती कधीही मिळणार नाही.भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता तो वेळ प्रार्थनेला द्या, स्वत:च्या आत डोकावून बघा, ध्यान करा. याने तुमचे चित्त टाळय़ावर येइल. निर्मळ मन तुम्हाला अधिक मानसिक समाधान देईल.

8) नित्यनेमाने

    ध्यानधारणा करा.

ध्यानाने मन शांत होते व अस्वस्थ करणाऱया विचारांपासून तुमची सुटका होते. यातुन तुम्ही परमशांती प्राप्त करू शकता. प्रामाणिकपणे रोज अर्धा तास जरी ध्यान केले तरी बाकी साडेतेवीस तास तुमचे मन प्रसन्न राहील. या ना त्या कारणाने ढळणारा मनाचा तोल सावरेल. ध्यानाचा वेळ थोडा थोडा वाढवित नेल्यास अधिक समाधान मिळेल.

9) मनाला कोठेतरी गुंतवून ठेवा.

 रिकाम्या मनात जगातले सगळे वाईट विचार येतात. मन चिंती ते वैरी न चिंती. काहीतरी सकारात्मक, विधायक कार्य करण्यात मनाला गुंतवून ठेवा.एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणारे काहीतरी करा. यातून तुम्हाला पैसा मिळेलच असे नाही पण भरून पावल्याचे , काही केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळेल.

10) धरसोड वृत्ती सोडा,

      खंत करू नका.

“करू की नको’’ असा विचार करीत राहिल्यास कृती काही होणार नाही मात्र दिवस, आठवडे, महिने, वर्ष वाया जाईल व डोक्मयाला ताप मात्र होईल. नियतीने तुमच्या पुढय़ात काय वाढलेले आहे, याचा थांगपत्ता तुम्हाला कधीही लागणार नाही. तेव्हा उगीच घोळ न घालता ज्या वेळी जे करणे योग्य आहे, त्या वेळी ते करा.

Related Stories

माठ देतो गारवा

tarunbharat

बाजरीचे दिवस

Patil_p

ऊर्जा सकारात्मकतेचा

tarunbharat

प्रदूषणापासून सावध व्हा !

Patil_p

ऋतु आला लोणच्याचा

Patil_p

कैलास मानससरोवर यात्रेची अनुभूती

Patil_p