Tarun Bharat

सार्थक सेवा संघातील निराधार मुलांना मदत

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

आनंदवन बहुउद्देशीय संस्था व डॉ.अजय दुधाणे मित्र परिवारतर्फे शिवाजीनगर परिसरात गोमाता पूजन व त्यांच्यासाठी चारा उपलब्ध करुन देण्यात आला. तसेच सार्थक सेवा संघ आंबळे, पुरंदर येथे निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला भाजीपाला व फळे यांसह जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. अजय दुधाणे यांच्या हस्ते गाईंची पुजा करण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रकल्प समन्वयक वैभव शिंदे, अधीक्षक शिवानंद जेटगी, सहाय्यक अक्षय जाधव, कृष्णा पवार, दत्तात्रय सोनार, विवेक राजगुरू, महेश वाडेकर, प्रकाश पवार, रवी पासलकर, अमित शिंदे उपस्थित होते.


डॉ. अजय दुधाणे म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे अनेक स्वयंसेवी संस्था अडचणीत आलेल्या आहेत. अशावेळी त्यांना मदतीचा हात देणे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून दररोज लागणारा भाजीपाला आणि फळे देण्यात आली. तसेच गोमातेचे पूजन करुन त्यांना देखील चारा देण्यात आला.

Related Stories

इतिहास पोहचविण्याचा चपराकचा पुढाकार महत्त्वपूर्ण : गायकवाड

prashant_c

परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणाऱ्या प्रत्येक विचारास प्राधान्य

Tousif Mujawar

नृत्याचा खेळ गणिताच्या सहाय्याने खेळावा लागतो : सुचेता भिडे-चापेकर

Tousif Mujawar

…आणि छायाचित्रकारांच्या नजरेतून उलगडला राम नदीचा प्रवास

prashant_c

पानिपत हा पराभवाचा नव्हे, तर आपल्या शौर्याचा इतिहास : आशुतोष गोवारीकर

prashant_c

लई भारी : ‘त्या’ कारच्या बदल्यात मिळाली नवी कोरी कार गिफ्ट

Tousif Mujawar
error: Content is protected !!