Tarun Bharat

सार्वजनिक गणेशोत्सवावर अनिश्चिततेची टांगती तलवार

बेळगाव / प्रतिनिधी

 गणेशोत्सव साजरा करावा की नाही, याबाबत प्रशासनाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. मूर्तिकारांनी श्रीमूर्ती तयार केल्या आहेत. मंटप डेकोरेटरही  प्रतीक्षेत आहेत. विपेत्यांनी मोठय़ा प्रमाणात सजावटीचे साहित्य बाजारपेठेत आणले आहे. परंतु या सर्वांवरच अनिश्चिततेची टांगती तलवार आहे.

दरवषी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीबाबत मूर्ती तयार झाल्यानंतरच प्रशासन फतवा काढते आणि ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या म्हणीप्रमाणे पुन्हा मूर्तिकार आणि प्रशासन यांच्यातील वादाला तोंड फुटते. सध्या यामध्ये कोरोनाने भर घातली आहे. हा एकच उत्सव असा आहे की ज्यामुळे शेकडो हातांना कामे मिळतात. आजघडीला मिळेल ते काम स्वीकारण्याची मानसिकता दिसू लागली आहे. अशा वेळी काम मिळण्याची संधीच जर मिळाली नाही तर आर्थिक घडी कशी बसवायची, असा प्रश्न पडला आहे.

गणेशोत्सवापर्यंत कोरोनाचे संकट टळेल अशी आशा करून मूर्तिकारांनी मूर्ती तयार केल्या आहेत. साधारण अंदाज लक्षात घेत यंदा मूर्तींची उंची कमी करण्यात आली आहे. परंतु उत्सव मात्र व्हावा अशीच सर्वांची अपेक्षा आहे. गणेशोत्सव हा बाजारपेठेचे अर्थचक्र गतिमान करतो हे वास्तव आहे. याची सुरुवात शाडू, माती यांच्या विक्रीपासून होते. त्यातून मूर्तिकार मूर्ती घडवतो. त्यामुळे त्याचे हात राबते राहतात. मूर्ती रंगविण्यासाठी तरुणाई पुढे येते. अनेक ठिकाणी महिलांनाही संधी मिळते. त्यामुळे त्यांच्या हाती चार पैसे खेळतात.

गणेशोत्सव आणि सजावट यांचे एक वेगळेच समिकरण आहे. सजावटीसाठी हजारो तऱहेचे साहित्य बाजारात येते. त्याची विक्री करणारे विपेते, विद्युत रोषणाई करणारे कंत्राटदार, विद्युत रोषणाईचे साहित्य विकणारे विपेते, मंटप कंत्राटदार, त्यांच्याकडील कामगार, पूजा-अर्चा करणारे पुरोहित, पूजेचे साहित्य विपेते, श्रीफळ विपेते, हार फुले विपेते, मिठाई विपेते, मखर विपेते असे एक ना अनेक घटकांचे हात उत्सवासाठी राबतात, तेव्हा त्यांच्या हाती पैसे खुळखुळतात. इतकेच नव्हे तर मंटपापाशी किंवा बाजारपेठेत खेळणी विकणारे, फुगे विकणारे हेसुद्धा याच निमित्ताने चार पैसे मिळवितात. ही एकात एक अडकलेली साखळी अखंड राहणे खूप महत्त्वाचे आहे.

मात्र, कोरोना ही साखळी अखंड राहू देणार का हा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. मूर्ती तयार झाल्याने मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उत्सव व्हावा अशी इच्छा आहे. मात्र हा सार्वजनिक उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करावा की न करावा, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. मंडळांच्या मते उत्सव साधेपणाने दीड दिवस, पाच दिवस किंवा अकरा दिवस करणे शक्मय आहे. आम्ही यंदा गर्दी करणार नाही, वर्गणी घेणार नाही, महाप्रसाद आयोजित करणार नाही असे स्पष्ट करत अनेक मंडळांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

वर्षानुवर्षांचा हा उत्सव खंडित न करता साधेपणाने करण्यासाठी मंडळे तयार आहेत. मात्र प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना परवानगी देण्याबाबत साशंक आहे. एकूणच सध्या प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांच्यातील मतभिन्नतेमुळे उत्सवाचे भवितव्य अद्याप धूसर आहे. सर्वांच्या संमतीने, समन्वयाने सुवर्णमध्य काढून उत्सवाची परंपरा कायम ठेवत कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन न करता उत्सव करण्यास परवानगी द्यावी, अशी गणेशोत्सव मंडळांची मागणी आहे.

परवानगी देण्याबाबत अद्याप निर्णय नाही

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत पोलीस आणि जिल्हा प्रशासन मंगळवारी आपला निर्णय देणार होते. मात्र मंगळवारी कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या 11 दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव मंडळांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. सरकारने कोरोनाबाबत जी नियमावली घातली आहे. त्याचे पालन करत आम्ही गणेशोत्सव साजरा करू, अशी विनंती मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने केली आहे. मात्र जिल्हा प्रशासन अजूनही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Related Stories

कडोली येथे दुकान फोडून 60 हजारांचा ऐवज लंपास

Patil_p

श्री चषक ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Amit Kulkarni

शंकर चाफाडकर स्मृती निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Omkar B

निघाला माझा लंबोदर….

Patil_p

देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन

Patil_p

40 टक्के कमिशनवर काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव

Amit Kulkarni