Tarun Bharat

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे डॉ. याळगी यांचा सत्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

टिळकवाडी रॉय रोडवरील डॉ. सतीश याळगी यांनी गेली 50 वर्षे निरंतर वैद्यकीय सेवा करून या सेवेचा सुवर्णमहोत्सव पूर्ण केला. याबद्दल पहिले रेल्वेगेट जवळील टिळकवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

डॉ. सतीश याळगी, टिळकवाडी परिसरात नावाजलेले डॉक्टर म्हणून ओळखले जातात. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी अखंडपणे रुग्णांना तपासले आहे. अलिकडेच त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेला प्रारंभ करून 50 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या सेवेची दखल घेऊन गणेशोत्सव मंडळाने त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी नारायण पै, लता याळगी तसेच मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. याळगी यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व आपण असेच कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.

Related Stories

चक्क माकडांनीही राखले सामाजिक अंतराचे भान

Amit Kulkarni

बेकिनकेरेत उद्या भव्य जंगी बैलगाडी शर्यत

Amit Kulkarni

लोककल्प फौंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

Amit Kulkarni

केआर शेट्टी किंग्ज, स्पोर्ट्स ऑन संघांचे विजय

Amit Kulkarni

मच्छे गावाजवळ अनोळखीचा मृत्यू

Patil_p

कंझ्युमर फोरमसाठी वकील आक्रमक

Amit Kulkarni