Tarun Bharat

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यावर, थुंकण्यावर बंदी घाला : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांना सूचना

Advertisements

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात फैलावत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने विविध उपाययोजना करत आहेत‌. त्यातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील सर्व राज्यांना सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यावर आणि थुंकण्यावर बंदी घालायला सांगितले आहे. 


सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात सांगितले आहे की, तंबाखू, पान मसाला आणि सुपारी खाल्ल्यामुळे शरीरात लाळ अधिक प्रमाणात तयार होऊन ती थुंकण्याची इच्छा होते‌. आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोविड – 19 चा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय आर्युविज्ञान चिकित्सा  परिषदेने जनतेला तंबाखू खाण्यापासून दूर रहा आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असे आवाहन केले आहे. 


दरम्यान बिहार, झारखंड, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, हरयाणा, आसाम अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकण्यास बंदी घातली आहे. दरम्यान शनिवारपर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या 7447 झाली असून आतापर्यंत 239 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related Stories

धक्कादायक! पंजाबमध्ये एका टोळक्याकडून पोलिसांवर हल्ला

prashant_c

वायू प्रदूषण शोषणारे कापड

Patil_p

लष्कर आणि जैशसारख्या संघटना निर्भयपणे दहशत पसरवत आहे ; UNSCमध्ये एस. जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका

Archana Banage

दिल्ली : 45 दिवसांच्या चिमुकलीची झुंज अखेर अपयशी

prashant_c

पन्हाळगडावरील चार दरवाज्याच्या पायथ्याची दरड खचली

Abhijeet Khandekar

पुणे : प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने उद्यापासून सुरू होणार

Tousif Mujawar
error: Content is protected !!