Tarun Bharat

सार्वजनिक ठिकाणी पान-तंबाखू खाताय सावधान !

Advertisements

दंडात्मक कारवाईचा मनपाचा इशारा

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनाचा धोका वाढत असताना देखील शहरात नागरिक विना मास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू, गुटखा खाऊन थुंकत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विना मास्क फिरणाऱया आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. रस्त्यावरून जाणारे वाहन चालक, दुकानचालक, व्यवसायिक, फेरीवाले आदिंसह सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू व गुटखा खाण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरताना तसेच धुम्रपान व पान -तंबाखू खाताना आढळल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱयांच्या वतीने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:चा आणि कुटुंबासह संपर्कात येणाऱया नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी मास्क वापरावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी पान-तंबाखू सेवन करू नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले आहे. याकडे दुर्लक्ष करून विना मास्क फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही पत्रकाद्वारे दिला आहे.

Related Stories

रत्नागिरी जिल्हा सोमवारी ‘कोरोना शून्य’

Patil_p

बैलहोंगल-सौंदत्ती तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा.

Patil_p

महिनाभरापासून जानेवाडी गाव अंधारात

Amit Kulkarni

ऑनलाईन राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत स्नीता लंबोर प्रथम

datta jadhav

सेंट झेवियर्स, वनिता विद्यालय बास्केटबॉल स्पर्धेत विजेते

Amit Kulkarni

अनगोळ पशुवैद्यकीय दवाखान्यालाच उपचाराची गरज

Patil_p
error: Content is protected !!