Tarun Bharat

सार्वजनिक वाचनालयातर्फे दिवाळी अंक प्रकाशित

प्रतिनिधी/ बेळगाव

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दिवाळी अंकाचा शुभारंभ करण्यात आला. ज्ये÷ वाचक सहदेव घसारी यांना पहिला अंक वितरित करून योजनेला प्रारंभ करण्यात आला. यावषीही वाचनालयाने अडीचशे रुपये भरून पाच महिने दिवाळी अंक वाचण्याची योजना कार्यरत ठेवली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर होते.

व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक ईश्वर मुचंडी, वाय. एम. तारळेकर, नागेश सातेरी, चिटणीस नेताजी जाधव उपस्थित होते. नेताजी जाधव यांनी स्वागत करून योजनांची माहिती दिली. मुख्य शाखेसह अनगोळ शाखेतही हे अंक उपलब्ध करून ठेवण्यात आले आहेत.

यावेळी कृष्णा शहापूरकर, संचालक अनंत लाड यांची भाषणे झाली. ईश्वर मुचंडी यांनी आभार मानले. याप्रसंगी वाचनालयाचे संचालक अनंत जाधव, अनंत जांगळे, अभय याळगी आणि वाचक उपस्थित होते.

Related Stories

निवृत्त वन अधिकाऱयाला धमकावून चार लाखांची लूट

Amit Kulkarni

वीज संघाचे 115 कोटीचे व्याज माफ करा

Omkar B

कडोलीच्या सुपुत्राची गड संवर्धन समितीत निवड

Amit Kulkarni

साहिल चलवेटकरची जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Amit Kulkarni

…अन् जखमी रुग्णाच्या खिशातील रक्कम केली परत

tarunbharat

उसाची बिले ताबडतोब देणार

Rohit Salunke