Tarun Bharat

साळ गाव यावषीही पुराच्या वेढय़ात काही घरांमध्ये घुसले पाणी

शेतंची अतोनात हानी / टेक्टर झाले निकामी / गावात कचऱयाचे साम्राज्य

डिचोली / प्रतिनिधी

तिळारी धरणातून सोडण्यात येणारे पाणी त्यातच अविश्रांत जोरदारपणे कोसळलेल्या पावसामुळे डिचोली मतदारसंघातील साळ गावाला पुराने वेढा घातला. गावातील सखल भागातील घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे ऐन रात्रीच्या वेळी अंधारात साळवासीयांवर हाहाकार ओढावला. सतत तिसऱया वषी जलसंसाधन खात्याच्या बेसावधगिरीमुळे व बेभरवशामुळे पूर आला असून येथील जनतेला पुराच्या दिवशी व नंतर विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पुरस्थितीची सभापती राजेश पाटणेकर यांनी इतर अधिकाऱयांसह पाहणी केली.

      तिळारी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले व स्थिती नियंत्रणात न राहिल्यामुळे पूर आलेला आहे.धरणातून सोडण्यात आलेले पाणी, अतिवृष्टी आणि समुद्राला आलेली भरती यामुळे पाण्याची पातळी वाढली. धरणातून रात्री दोन वाजता मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे पहाटे चार वाजता साळ क्षेत्रात पाण्याची पातळी वाढली. सहाच्या सुमारास खालचावाडा येथील श्री महादेव भूमिका मंदिर परिसरात पाणी वाढता अकरा वाजेपर्यंत भूमिका मंदिरात सहा फूट उंच पाणी वाढले. त्यामुळे साळ मधील पंचवीस तीस घरांना पुराचा तडाखा बसला आहे.

शेतींची हानी, 10 टेक्टर पाण्याखाली

    केळी बागायती दारांना याचवषी हा दुसऱयांदा तडाखा बसला आहे. काही केळी बागायतीतील केळी उन्मळून पडल्या तर अधिकांश वाहून गेल्या आहेत. योग्य त्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी “तरवा ” लावणीत मग्न होता. त्यामुळे शेती नांगरणी करणारे विविध शेतकऱयांचे दहा  ट्रक्टर रात्रीचे शेतात होते तसेच तरवा लावण्यासाठी हजारोंच्या संख्येनं पेंढय़ा शेतात होत्या. पहाटे येथील श्रमिक जागा होईपर्यंत काहींच्या घरात पाणी घुसले होते तर शेती क्षेत्र पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने दहाही ट्रक्टर पाण्याखाली आहेत. रोपणी केलेला तरवा व काढून ठेवलेल्या पेंढय़ा वाहून गेल्यात.

सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह अनेकांनी केली पाहणी

  मंदिर परिसरात पाणी वाढू लागल्याने येथील ट्रान्सफॉर्मर बंद करून विजपुरवठा खंडित केला, त्यामुळे खालचा वाडा येथील सर्व घरे काळोखात आहेत. हे सतत तिन्हीही वर्षे चालू आहे. येथील ट्रान्सफॉर्मरची जागा बदलण्यात यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा आश्वासनाकडे पलिकडे पदरी निराशाच पडली आहे. फाईल तयार आहे, टेंडर होणार हिच आश्वासने देत आहेत. पुराची वार्ता कळताच माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटय़े तात्काळ पोचले तसेच सभापती राजेश पाटणेकर, अभियंते रवळू शेटय़े तसेच पोलीस यंत्रणा, अग्निशमन दलाचे जवान येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कॅप्टन ऑफ पोर्ट ट्रस्ट अधिकारी जी. एम. ब्रागाझा तसेच इतर अधिकारी,  माजी आमदार नरेश सावळ तसेच डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित पोहोचले. सर्वांनी साळ येथील पूर स्थितीची पाहणी करून निरीक्षण केले तसेच शेवटी मामलेदार पंडित यांनी सांगितले की डिचोली तालुक्मयातील इतर गावापेक्षा साळ येथील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे तसेच पूरस्थितीवर नजर ठेवून पोलीस यंत्रणा व कॅप्टन ऑफ पोस्ट चेक कर्मचारी तैनात केले आहेत ते स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

स्थानिकांनी दिल मदतीचा हात

      अचानक पाणी वाढल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला. पाणी शिरल्याने घरातील व्यक्तींना घरातील सामान काढण्यास सुद्धा वेळ मिळाला नाही .अंकुश राऊत यांनी गोठय़ात म्हशी बांधल्या होत्या तेथे गळया पर्यंत पाणी भरले होते. शेजाऱयांनी पोहत जाऊन त्यांच्या म्हशीची दावे सोडून त्यांची सुटका केली. पूरस्थितीवर नजर ठेवून येथील जनतेला मदत करण्यासाठी युवकांचे हात सरसावले आहेत. येथे उपस्थित राहिलेले वीज खात्याची कनि÷ अभियंते रामा सावंत यांनी वीज खंडित केलेल्या वाडय़ाचा अंदाज घेऊन कर्मचाऱयाद्वारे मधलावाडा येथे वीज जोडणी करून काही घरांना वीज प्रवाह सुरळीत करून दिला तसेच येथील युवक वर्गाबरोबर समाजसेवक मेघशाम राऊत, देवस्थान समितीचे अध्यक्ष कालिदास राऊत, पंच प्रकाश राऊत, पंच वासुदेव परब ,उपसरपंच वर्षा साळकर व सरपंच घनश्याम राऊत हे जातीने हजर राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी. नुकसानीचा अहवाल तयार करण्याची सुचना.

 डिचोली येथील क्षेत्रीय विभागीय कृषी अधिकारी श्री दिपक गडेकर  येऊन स्थितीची पाहणी केली तसेच येथील कार्यरत असलेले तलाठी श्री. चोपडेकर हे पूर्णपणे लक्ष देऊन एकंदर पंचनामा करीत आहेत .श्री माडयेश्वर येथील पाणी उपसा स्थान पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने  पाणी उपसून आमठाणे धरणात व तिथून अडवलपाल येथे जलशुद्धीकरण यास पाणीपुरवठा करीत होते ते सारे पंप पाण्याखाली गेल्याने पाणी पुरवठा खात्याचे मोठे नुकसान झाले आहेत तसेच जुवाड क्षेत्रातील केळी बागायती व भाजीपाला लागवड केलेले क्षेत्र पूर्णपणे नष्ट झाले आहे तद्नंतर संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित व तसेच उत्तर जिल्हाधिकारी अजित राॅ³ा व पाणी पुरवठा खात्याचे कनि÷ अभियंता येथे येऊन पुराच्या पाण्याची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला. पुरात विविध प्रकारच्या नुकसानीचा आढावा घेत पंचनामे करावेत व येथील पुरग्रस्ताना सरकार कडून मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी सांगितले.

Related Stories

अटलसेतू मातीच्या भरावाचा जोडभाग खचला

Omkar B

गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले

Omkar B

‘हाव्स बिल्डिंग ऍडव्हान्स’ योजना मागे घेतल्याने मानवी हक्काचा भंग नव्हे

Amit Kulkarni

केरी सत्तरीत स्वच्छता मोहिमेला स्थानिकाचा आक्षेप

Amit Kulkarni

पणजी – फोंडा महामार्गावर ओल्ड गोव्यात खड्डय़ांचे साम्राज्य

Patil_p

विरोधीपक्षाने पंतप्रधानांना खलाशांची आकडेवारी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग

Omkar B