घटनेने खळबळ
सावंतवाडी/ प्रतिनिधी
सावंतवाडी उभाबाजार शाळा नंबर २ जवळ दोन वृद्ध महिलांचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.
धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आले. नीलिमा नारायण खानविलकर (८०) व शालिनी शांताराम सावंत (७५) अशी त्यांची नावे आहेत. सावंत या खानविलकर यांच्याकडे केअरटेकर होत्या.


सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर हे आज सकाळी त्यांच्या घरी टीव्ही सुरू करून देण्यासाठी गेले असता त्यांच्या हा प्रकार उघडकीस आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तपास सुरू आहे. खानविलकर या आपल्या जुन्या घरी राहत होत्या.
त्यांचे नातेवाईक नाहीत. खून दागिने की अन्य कारणासाठी झाला, हे तपासानंतर उघड होणार आहे. या घटनेने सावंतवाडी शहरात खळबळ उडाली आहे.