Tarun Bharat

सावंतवाडीत शनिवारी होप एक्स्प्रेस मोफत कॅन्सर पुर्व तपासणी शिबिर

सावंतवाडी रोटरी क्लबचे आयोजन

सावंतवाडी/ प्रतिनिधी-

रोटरी क्लबच्या पुढाकाराने सावंतवाडी शहरात राजवाडा साधले मेस नजिक फिजिओथेरेपी सेंटर येथे शनिवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होप एक्स्प्रेस मोफत कॅन्सर पुर्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रोटरीचे डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन गौरीश धोंड यांच्या नेतृत्वाखाली व डिस्ट्रिक्ट कम्युनिटी सर्व्हिस सेक्रेटरी डाॅ. लेनि डिकाॅस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे. वाढत्या कॅन्सर रुग्णांची संख्या पाहून सावंतवाडी रोटरी क्लब व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नगराध्यक्ष संजु परब यांच्या सहकार्याने सावंतवाडीत हे शिबिर होत आहे.


या शिबिरात कॅन्सर संबंधित तपासण्या केल्या जाणार आहेत. या शिबिराचा सर्व गरजूनी लाभ घ्यावा आणि नाव नोंदणी श्रीया नाईक ९४०४३९६०२६ आणि सत्यजित धारणकर यांच्याकडे करावी असे आवाहन असे रोटरीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, सचिव सुधीर नाईक, खजिनदार आनंद रासम, डॉ. राजेश नवांगुळ यांनी केले आहे.

Related Stories

महिला बचत गटांना देणार मोफत ‘सेलम’ हळदीचे बियाणे

NIKHIL_N

कोरोना चाचणीनंतर ‘त्या’ संशयितांना होणार अटक

Patil_p

महामार्गावर एकाच रात्री तीन घरफोडय़ा

Patil_p

छप्पर कोसळले;महिला सुदैवाने बचावली

Anuja Kudatarkar

नरडवे प्रकल्पांतर्गत रॉयल्टीमध्ये गैरव्यवहार!

NIKHIL_N

सिंधुदुर्ग जिल्हय़ात पाऊस दमदार

NIKHIL_N