Tarun Bharat

सावंतवाडी – कुडासे – मोर्ले – केर वस्तीची एसटी बस फेरी सुरू

दोडामार्ग / वार्ताहर:
लॉकडाऊन काळापासून बंद असलेली सावंतवाडी – कुडासे – मोर्ले – केर अशी वस्तीची एसटी बस फेरी सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती मोर्ले गावचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी दिली आहे.
गेल्या अडीच वर्षापासून लॉकडाऊनमुळे राज्यभरातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक गावांत जाणाऱ्या वस्तीची एसटी बस फेऱ्या सर्व बंद करण्यात आल्या होत्या. त्या आतापर्यत बंदच होत्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. अनेक बाजारपेठा सुरू होताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी ते केर अशी एसटी बस फेरी सुरू करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. या मागणीचा विचार करत गोपाळ गवस यांनी विभागीय वाहतूक अधिकारी मोहनदास खराडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत ही एसटी बस फेरी सुरू केली आहे. ही बस फेरी सावंतवाडीवरून 4 वा. निघणार असून ती कुडासे मार्गे मोर्ले व केर येथे वस्तीला जाणार आहे. तसेच केर येथून सकाळी 6.30 वा. सावंतवाडीला जायला निघणार आहे. तरी या बसफेरीचा अनेकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. गवस यांनी केले आहे.

Related Stories

विकासाच्या मुद्यावर महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार

NIKHIL_N

‘लॉकडाऊन’मध्ये 3912 जणांवर कारवाई

NIKHIL_N

कोळंब ग्रामस्थ आक्रमक;सुमारे पंधरा डंपर रोखले!

Anuja Kudatarkar

माठेवाडा ते पांजरवाडा रस्त्याच्या दुरावस्थेकडे राष्ट्रवादी काँग्रेसने वेधले लक्ष

Anuja Kudatarkar

‘किसान सन्मान’च्या अडीच हजार शेतकऱयांकडून दोन कोटीची वसुली

Patil_p

रत्नागिरी : लॉकडाऊन असतानाही दापोलीत पर्यटक

Archana Banage
error: Content is protected !!