Tarun Bharat

सावंतवाडी तालुक्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू

वार्ताहर / सावंतवाडी:

गेल्या मार्च महिन्यापासून म्हणजे तब्बल वर्षभर कोरोना महामारीने सर्वानाच त्रस्त करून सोडले आहे. त्यात शाळा, कॉलेज, महाविद्यालय ऑफलाइनवरून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सुरू होती. नोव्हेंबरपासून नववी ते बारावी शाळा सुरू करण्याला शासनाने सहमती दिली. त्यानंतर शाळेची घंटा वाजली खरी, मात्र जूनपासून पहिली ते आठवीपर्यंतचे शाळा शिक्षक त्यांच्या वाडीवर जाऊन शिकवत होते. आता शाळा सगळीकडे भरू लागल्या आहेत. सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण भागासह शहरात पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व इयत्तेतील वर्ग आता पालकांच्या संमतीने भरत आहेत. पाचवी ते आठवीचे वर्ग गेल्या दोन महिन्यापासून सुरू करण्यात शासनाने परवानगी दिली. त्यानंतर प्राथमिक शाळाही आता पूर्ण क्षमतेने भरत आहेत. मात्र, पहिली ते चौथीचे वर्ग भरण्यास शासनाने परवानगी दिली नसली तरी पालकांच्या संमतीने हे वर्गही सुरू करण्यास शासनाने सहमती दिली. त्यानुसार सावंतवाडी तालुक्यातील पहिली ते चौथीचेचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे वर्षभरानंतर बच्चे कंपनी शाळेचे दप्तर घेऊन आनंदाने शाळेत येऊ लागली आहे.

सावंतवाडी तालुक्यासह काही जिह्यातील काही भागातही पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा आता भरू लागल्या आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष तसेच कोरोनात गेले. त्यामुळे शैक्षणिक नुकसानही मुलांचे झाले आहे. आता दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्यात होणाऱया वाषिक परीक्षा यंदा नुकत्यात सर्व शाळा ऑफलाईन सुरू झाल्याने परीक्षांचे वेळापत्रक आता कसे करायचे शिक्षण विभाग विचाराधीन आहे. वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस का असेना सिंधुदुर्गातील शाळा पहिली ते बारावीपर्यंतच्या ऑनलाइनवरून ऑफलाइन वर सुरू झाल्याने बच्चे कंपनीसह मोठय़ा विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. त्या प्रत्येक शाळेत घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाने आखले आहे. त्यामुळे त्या एप्रिल अखेरीसपासून संपूर्ण महिना दहावी-बारावीच्या परीक्षामध्ये जाणार आहे. पहिली ते दहावीच्या वर्ग शाळांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. शाळा आता अवघे दोन तास भरताहेत. सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्ग भरत असल्याने सावंतवाडी तालुका अग्रेसर ठरला आहे. सावंतवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले. पालकांच्या लेखी संमतीने पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आम्ही सुरू केले आहेत. पूर्ण दक्षता घेऊनच शाळेत विद्यार्थी येत आहेत. येथे वर्षभर मुले घरी राहून कंटाळली होती. जी मुले शाळेत येत आहेत त्यांना आपल्या शाळेत येत नाही त्यांना ऑनलाईन शिक्षण तालुक्यात सुरू आहे. सभापती शीतल राऊळ यांनी स्पष्ट केले, तालुक्यात कोरोनाचा असर कमी आहे त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार आहेत. आम्ही पूर्ण दक्षता घेऊनच शाळा सुरू केल्या आहेत आणि सर्व शाळांना मुलांची आरोग्य तपासणी करून प्रवेश दिला जात आहे. आमचा सर्व शाळांवर पूर्ण लक्ष आहे असे ते म्हणाले.

Related Stories

सावडाव येथील रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या

NIKHIL_N

लॉकडाऊनच्या काळात जाधव कुटुंबीयांनी खोदली 55 फुट विहीर

Patil_p

चिपळुणातील उड्डाण पुलास पुढील महिन्यात प्रारंभ!

Patil_p

कुडाळ आगारात आली ‘विठाई’

NIKHIL_N

‘पॉझिटिव्ह’ची संख्या 99 वरून 113 वर

NIKHIL_N

पुरळला झाले आगळे ‘शुभमंगल सावधान’

NIKHIL_N