Tarun Bharat

सावंतवाडी पालिकेची स्वच्छतेत आघाडी

Advertisements

‘कोरोना’मुळे सफाईवर भर, आणखी 20 हजार मास्क देणार

प्रतिनिधी / सावंतवाडी:

नगराध्यक्ष संजू परब ‘कोरोना’बाबत सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने सर्व पातळीवर दक्षता घेत आहेत. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचे ‘कोरोना’पासून संरक्षण होण्यासाठी साफसफाई, शहर निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले असून प्रत्येक नागरिकासाठी मास्क देण्याचा निर्धार केला आहे. आतापर्यंत 20 हजार नागरिकांना मास्क नगरपालिकेच्या माध्यमातून दिले आहेत. आणखी 20 हजार मास्क वितरित करण्यात येणार आहेत. तसेच तापाची लक्षणे असलेले संशयित रुग्ण समजण्यासाठी डिजिटल थर्मामीटर पालिका खरेदी करणार असल्याचे नगराध्यक्ष परब यांनी सांगितले.

सावंतवाडी नगरपालिकेने ‘कोरोना’च्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच काम सुरू केले आहे. शहरात गर्दी टाळण्यासाठी प्रभागवार भाजी केंद्रे, घरपोच किराणा माल सेवा सुरू केली आहे. साफसफाईबरोबर निर्जंतुकीकरण फवारणी वारंवार करण्यात येत आहे. इमारतींमध्येही फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले.

शहरात पहिल्या टप्प्यात 20 हजार मास्कचे वितरण केले आहे. आणखी 20 हजार मास्क दिले जाणार आहेत. ‘कोरोना’पासून कर्मचाऱयांचे संरक्षण व्हावे, यासाठी 315 पीपीई किट घेण्यात येणार आहेत. सदर किट काही दिवसात उपलब्ध होणार असून यामुळे कर्मचाऱयांना भयमुक्त वातावरणात काम करता येणार आहे. त्यामुळे कामाची गतीही वाढणार आहे. याशिवाय एक हजार 500 मि. ली. सॅनिटायझर बॉटल, एन-95 चे 300 मास्क खरेदी करण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले.

सध्या पालिका ‘कोरोना’चा फैलाव सावंतवाडीत होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना शहरात सुरू आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. नागरिकांच्या संयमावरच ही महत्त्वाची लढाई जिंकू शकतो. नगरपालिका तुमचे संरक्षण करण्यासाठी तयार आहे. परंतु नागरिकांचाही संयम महत्त्वाचा असल्याचे परब यांनी सांगितले.

Related Stories

मिलाग्रीसच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

NIKHIL_N

जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यतासाठी सहा लाख

NIKHIL_N

मुंबईतील वीज बंदचा परिणाम रत्नागिरीतील बँकेवरही

Abhijeet Shinde

अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

NIKHIL_N

माजी उपनगराध्यक्ष सलाम खतीब दुचाकी अपघातात गंभीर जखमी

Patil_p

ओवळीये मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

NIKHIL_N
error: Content is protected !!