Tarun Bharat

सावंतवाडी बस डेपोच्या कामाची नगराध्यक्षांकडून पाहणी

Advertisements

जलदगतीने काम पूर्ण होण्यासाठी केल्या सूचना

वार्ताहर / सावंतवाडी:

सावंतवाडी नवीन बसस्थानक व डेपोचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बसस्थानकावर धूळ पसरली आहे. हे बसस्थानक लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी येत्या आठ दिवसात बैठक घेतली जाईल, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले. त्यांनी आज सावंतवाडीतील नवीन बस डेपोच्या कामाची पाहणी केली.

  यावेळी ते म्हणाले, गेली दोन वर्ष हे बस डेपा चे काम सुरू आह। पण अद्याप पूर्ण होत नाही. मग पंधरा महिन्यात हे काम पूर्ण कसे होईल. बस डेपोव बसस्थानकाच्या कामाची मुदत पूर्ण होत आली आहे. गेली दोन वर्षे डेपोचे काम सुरू आहे. जुने स्थानक पाडून ते कधी पूर्ण केले जाणार आहे. आता 2021 उजाडले आहे. मुदतीच्या उर्वरीत अवघ्या दीड वर्षात संपूर्ण एसटी बसस्थानकाचे काम कसे काय पूर्ण होईल? असा सवाल त्यांनी केला. सध्या बस डेपोचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. संबंधित ठेकेदारासमवेत येत्या आठ दिवसात एसटीच्या अधिकाऱयानी बैठक बोलवावी व योग्य तोडगा काढून सदर बसस्थानक व बस डेपोचे काम जलदगतीने व्हावे यासाठी चर्चा करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी सावंतवाडी एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक वैभव पडोळे. रामचंद्र वाडकर, नगरसेवक नासिर शेख, मनोज नाईक, आनंद नेवगी, अजय गोंधावळे, बंटी पुरोहित, अमित परब्। केतन आजगावकर, श्री. टेमकर आदी उपस्थित होते.

Related Stories

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग गुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा सिंधुदुर्ग भाजपाच्यावतीने सत्कार

Anuja Kudatarkar

तेजस एक्स्प्रेस 1 नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत

Patil_p

वाहनांचे आज मोफत निर्जंतुकीकरण

NIKHIL_N

‘आरटीपीसीआर’ ऐवजी आता ‘रॅपिड’ टेस्ट

NIKHIL_N

जिल्हय़ात 5 हजार 771 जण कोरोनामुक्त

NIKHIL_N

कालव्याचे पाईप जळून कोटय़वधीचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!