Tarun Bharat

सावईवेरे सातेरी देवीचा रथोत्सव उत्साहात

वार्ताहर /सावईवेरे

सावईवेरे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या जत्रोत्सवातील सुप्रसिद्ध रथोत्सव काल शनिवारी भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात संपन्न झाला.

  यानिमित्त सकाळी देवस्थानात विविध धार्मिक विधी व सायंकाळी श्री सातेरी देवस्थानाहून अनंत देवस्थानापर्यंत देवीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. श्री अनंत देवस्थानच्या प्रांगणात देवीच्या जयघोषात रथ नाचविण्यात आला. अनंत देवस्थानाहून परतत असताना भाविकांकडून ओवाळणी स्वीकारत श्री सातेरी देवस्थानात आगमन होऊन प्रांगणात रथ नाचविण्यात आला. त्यानंतर आरत्या, तीर्थप्रसाद व रात्री वेलकासकर बंधू प्रस्तूत धरिले गजचर्म सांब सदाशिवे हा तीन अंकी संगीत पौराणिक नाटय़प्रयोग झाला.

Related Stories

राज्यहितासाठी सरकारला सहकार्य करा

Amit Kulkarni

राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

Patil_p

उत्पल पर्रीकरांकडून प्लाझ्मा दान

Patil_p

मडगावातील मजुरांची वाढती वर्दळ ठरतेय चिंतेचा विषय

Omkar B

लोकमान्यच्या तिस्क उसगांव शाखेतर्फे शिक्षकांचा सन्मान

Amit Kulkarni

खासगी वनक्षेत्र प्रकरणात सरकारने तातडीने लक्ष घालावे

Amit Kulkarni