Tarun Bharat

सावडाव येथील रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या

प्रतिनिधी / कणकवली:

सावडाव – डगरेवाडी येथील रिक्षा व्यावसायीक एकनाथ वामन डगरे (60) यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावत आत्महत्या केली आहे.

एकनाथ डगरे हे कलमठ – गावडेवाडी येथे स्थायीक झाले होते. लॉकडाऊनपूर्वी मुंबईला गेले होते. चार दिवसांपूर्वी डगरे हे मुंबईहून आपल्या सावडाव या मूळ गावी आले होते. दरम्यान, शुक्रवारी सायं. 4.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील किचनरुममध्ये छताखालील लोखंडी चॅनलला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण, पोलीस हवालदार अमीत खाडये यांनी घटनास्थळी पंचनामा केला. याबाबत खबर लिलाधर भगवान डगरे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

होम क्वारंटाईन शिक्क्यामुळे इन्फेक्शन

NIKHIL_N

कोकण कन्येच्या मदतीला धावून आला मास्टर ब्लास्टर!

Patil_p

जिल्हय़ात 610 नवे कोरोनाबाधित

Patil_p

मास्कच्या कारवाईने संगमेश्वर बाजारपेठेत धावपळ

Patil_p

ओसवालनगरमध्ये सहा महिन्यांपासून चालत होता वेश्या व्यवसाय

Patil_p

आजपासुन रेशन धान्य दुकानदारांचे तीन दिवस देशव्यापी कामबंद आंदोलन

Anuja Kudatarkar