Tarun Bharat

सावधानी बाळगा अन्यथा सर्वस्व गमवाल!

अनोळखी प्रेंड रिक्वेस्टना प्रतिसाद धोक्मयाचा : हनीट्रपचे प्रकारही वाढले : बेळगाव शहरात फसवणुकीचे 50 हून अधिक प्रकार

प्रतिनिधी / बेळगाव

फेसबुकवरील एक प्रेंड रिक्वेस्ट अनेकांना महागात पडू शकते. कोणाला लाखो रुपयांचा फटका बसू शकतो तर आणखी कोणाला वैयक्तिक कारणासाठी बदनामीला सामोरे जावे लागते. अनोळखीने पाठविलेली प्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणाऱया बेळगाव येथील एका वृद्धेला 88 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर ही फसवणूक कशी होते? तंत्रज्ञानाच्या जगात एकमेकांना न पाहताही एखाद्याची आर्थिक लुबाडणूक कशी करता येते? याचे अनेक किस्से सामोरे आले आहेत.

‘तरुण भारत’ने या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या किमती भेटवस्तू पाठविल्याचे सांगत फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. या बरोबरच हनीट्रपच्या माध्यमातून धनिकांना नागवण्यात येत आहे. गेल्या अडीच महिन्यात एका बेळगाव शहरात फसवणुकीचे 50 हून अधिक प्रकार घडले असून निम्मी प्रकरणे पोलीस स्थानकापर्यंत पोहोचली आहेत तर निम्मी प्रकरणे परस्पर पैसे देऊन मिटविण्यात आली आहेत.

अशा प्रकरणांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता सोशल मीडियाचा वापर करणाऱया प्रत्येकाने जर थोडीशी खबरदारी बाळगली नाही तर आपली फसगत होणार हे निश्चित आहे, हे जाणणे गरजेचे आहे. प्रतिष्ठित व प्रथितयश व्यक्तींच्या फेसबुक अकौंटवर एक सुंदर तरुणीची प्रेंड रिक्वेस्ट येते. ती ऍक्सेप्ट केली की लगेच मेसेजवर चॅटिंग सुरू होते. एक-दोन दिवसात मोबाईल क्रमांक मिळविण्यात येतात. त्यानंतर व्हाट्सऍपवर चॅटिंग सुरू होते. फेसबुकवरील तरुणीचा लोभस चेहरा पाहून तिला भुलणाऱयाची वाट लागणे सुरू होते.

स्क्रीन रेकॉर्ड ऍप्लिकेशन आधीच डाऊनलोड

आपल्या घरी कोणी नाही, आपण एकाकी आहे, तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा होते आहे, असे सांगत व्हिडिओ कॉलची इच्छा व्यक्त केली जाते. व्हॉट्सकॉल व व्हिडियो कॉल रेकॉर्ड करता येत नाही, या भाबडय़ा समजुतीमुळेच फसगत होते. सावजाला हनीट्रपमध्ये अडकविण्यासाठी स्क्रीन रेकॉर्ड ऍप्लिकेशन आधीच डाऊनलोड केलेले असते. याच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलही रेकॉर्ड करता येतो.

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या कथित सीडी प्रकरणानंतर अशा प्रकारांवर बराच प्रकाश पडला आहे. व्हिडिओ कॉलच्या वेळी तरुणी अर्धनग्न होऊन समोरच्या व्यक्तीलाही कपडे उतरविण्यास भाग पाडते. हे सर्व रेकॉर्ड झालेले असते. सावजाला फसविण्यासाठी पुरेसे रेकॉर्डिंग मिळाले की त्याच्या व्हाट्सऍपला तो व्हिडिओ पाठविला जातो. आम्ही सांगतो तितके पैसे दे, नाही तर सोशल मीडियावर उघडे पाडू, असे धमकावले जाते. धमक्मयांना घाबरून केवळ अडीच महिन्यात बेळगाव येथील 50 हून अधिक जणांनी आर्थिक व्यवहार करून प्रकरणे मिटविल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

सर्वात जास्त आर्थिक फसवणूक हनीट्रप-भेटवस्तूच्या माध्यमातून

हनीट्रपबरोबरच किमती भेटवस्तू पाठविल्याचे सांगत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. नव्या कार्डसाठी जुन्या कार्डवरील 16 अंकी आकडा सांगा, असे सांगून बँक खात्यातील रक्कम गायब करण्यात येत होती. ओटीपी व क्मयुआर कोडच्या माध्यमातूनही आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत होते. आता सर्वात जास्त आर्थिक फसवणूक हनीट्रप व भेटवस्तूच्या माध्यमातून होत असल्याचे उघडकीस आले आहे.

प्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सावधान!

सायबर क्राईम विभागाकडे सध्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी नोंद होत आहेत. जर फसवणूक टाळायची असेल तर कोणाचीही प्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना प्रत्येकाने सावधानता बाळगण्याची गरज आहे. रिक्वेस्ट पाठविणारी व्यक्ती आपल्या ओळखीची असेल तरच ती स्वीकारायला हवी, असे आवाहन येथील सीईएन (सायबर इकॉनॉमिक नार्कोटिक्स) चे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी केले आहे. सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर केला नाही तर मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. या बरोबरच बदनामीची नामुष्कीही ओढवू शकते. अलीकडे सुंदर तरुणींच्या छबींचा वापर करत सावजाला ठकविणाऱया टोळय़ा उदंड झाल्या आहेत. खबरदारी बाळगणे हा यावरील एकच उपाय आहे, असेही त्यांनी सांगितले.

परप्रांतीय गुन्हेगारांच्या टोळय़ा सक्रिय

अशा प्रकारांमागे परप्रांतीय गुन्हेगारांच्या टोळय़ा सक्रिय आहेत. बिहार, राजस्थान, नोएडा, नवी दिल्ली येथे कार्यालये थाटून बसलेल्या गुन्हेगारांकडून हे प्रकार केले जात आहेत. सध्या आणखी एक धोकादायक प्रकार सुरू झाला आहे. फेसबुकवरील एखाद्याचा फोटो घेऊन त्याच नावाने दुसरे बनावट अकौंट उघडले जाते. एक-दोन दिवसात त्याच्या मित्रांना मेसेंजरवरून एक मेसेज जातो, ‘मी आर्थिक अडचणीत आहे, मला इतकी मदत हवी आहे’, असा तो मेसेज असतो. पोलीस अधिकारी, वकील, पत्रकार आदी प्रति÷ितांच्या फोटोचा वापर करीत पैसे गोळा करण्याचा धंदा थाटला जात आहे. अलीकडेच येथील प्रसिद्ध वकील संग्राम कुलकर्णी यांच्या नावेही असा प्रकार घडला असून त्यांनी लगेच फेसबुकवर या प्रकाराशी आपला संबंध नाही, कोणीही भामटय़ांच्या थापांना बळी पडू नये, असे आवाहन केले होते. असे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत.

Related Stories

आरोग्य विभागातील निवृत्त अधिकाऱयाची देणगी

Tousif Mujawar

बडय़ा थकबाकीदारांच्या आस्थापनांसमोर हलगी वाजवा

Patil_p

लाळय़ा-खुरकत लसीकरण मोहीम लांबणीवर

Amit Kulkarni

बेळगाव रेल्वे स्थानकाला वीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव द्या

Amit Kulkarni

बेळगुंदी येथे हुतात्म्यांना अभिवादन

Tousif Mujawar

जी. जी. बॉईज, एवायएम ए संघ विजयी

Amit Kulkarni