Tarun Bharat

सावधान… मी आलोय!

Advertisements

प्रतिनिधी/ कराड

स्वच्छतेत कायम अग्रेसर असणाऱया व स्वच्छतेसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱया कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्लास्टीक वेस्टपासून कोरोना विषाणूची प्रतिकृती तयार केली आहे. या प्रतिकृतीच्या आधारे आरोग्य कर्मचारी शहरात नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱया कराड नगरपालिकेने यावर्षी स्वच्छतेबरोबरच वेस्ट टु वेल्थ या धोरणाला प्राधान्य दिले. यातून पालिकेने प्लास्टीक व अन्य टाकाऊ वस्तूंपासून विविध प्रतिकृती तयार केल्या आहेत. प्लास्टीक बाटल्यांपासून हत्ती, प्लास्टीक कपपासून महात्मा गांधीजींची प्रतिमा, मासा अशा प्रतिकृती तयार केल्या आहेत. आता कोरोनाच्या संकटामुळे पालिका शहरात युद्धपातळीवर सेवा देत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने आता कोरोनाविषयी जनजागृती व आणि त्या अनुषंगाने स्वच्छता, निर्जंतुकीकरण यावर भर दिला आहे. पालिकेने प्लास्टीकची घागर व इतर प्लास्टीकपासून कोरोनाची प्रतिकृती तयार केली आहे. पालिका आरोग्य विभागाच्या ट्रक्टर विभागाचे रवी कांबळे व सहकाऱयांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिकृती तयार केली आहे. कोरोनाचा मुखवटा व ड्रेस घालून पालिकेचा कर्मचारी आरोग्य विभागाच्या ट्रक्टरसोबत फिरून कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन नागरिकांना करणार आहे. शनिवारी भाजीपाला विक्री करणाऱया गाडीबरोबर या प्रतिकृतीने प्रबोधन केले.

मुळातच नगरपालिका, पोलीस दलाने कितीही आवाहन केले तरी लोक कोणतेही कारण काढून घराबाहेर पडत आहेत. या लोकांना कोरोनाबाबत प्रबोधन होण्यासाठी कर्मचारी काम करणार आहेत. शहरात रेशनसाठी, बँकेत पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी, भाजी पाल्यासाठी होणारी गर्दी अशा ठिकाणीही या प्रतिकृती लोकांचे प्रबोधन करणार आहे. याबरोबरच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचाही संदेश देणार आहे.

दोन अवलियांचीही जनजागृती

पालिकेने कोरोनाचा मुखवटा तयार करून जनजागृती सुरू केली आहे. मात्र यापूर्वी शहरातील दोन युवकही अशाच पद्धतीने कोरोनाचा मुखवटा घालून जनजागृती करताना दिसत आहेत. यातील एका युवकाने कोरोनाचा मुखवटा घातलेला असतो. मात्र या युवकांची नावे समजली नाहीत.

Related Stories

पालिकेच्या समोरची गळती काढण्याचे दोन दिवसांपासून काम सुरु

Patil_p

भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची यादी जाहीर; नितीन गडकरींना डावललं

Abhijeet Khandekar

निवडणूक पदवीधरांची प्रचारात उठाठेव राजकारण्यांची

Patil_p

अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी राहणार हजर

Abhijeet Shinde

हद्दवाढीत समावेश झाल्याने आकाशवाणी येथे आनंदोत्सव

Patil_p

अजित पवार यांची परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआय चौकशी करावी ; भाजपची मागणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!