Tarun Bharat

सावरकरांवरील आक्षेपार्ह लेखनाबद्दल निदर्शने

Advertisements

  पुणे / प्रतिनिधी :

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख प्रसिद्ध केल्याबद्दल सेवादल काँग्रेसचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने सारसबागेजवळील सावरकर स्मारकासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या आंदोलनात महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहर सरचिटणीस गणेश बिडकर, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष यांचा प्रमुख सहभाग होता.

शिवसेना सत्तेसाठी स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन करतेय : गिरीश बापट

मातृभूमीची सेवा करीत सावरकरांनी हजारो देशभक्त निर्माण केले. परंतु, देशप्रेम, स्वातंत्र्यसंग्राम आणि स्वातंत्र्यवीर यांच्याबद्दल काँग्रेसला कोणतेही प्रेम राहिलेले नाही. देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कॉग्रेसकरीत आहे. शिवसेना सत्तेसाठी स्वातंत्र्यवीराचा अपमान सहन करीत आहे, ही शोकांतिका आहे. समाज हे पाहात असून योग्य वेळी त्यांना धडा शिकवेल, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली.

Related Stories

‘कोरोनाचे संकट दूर होऊ दे, सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे’

Archana Banage

बिलोलीच्या घटनेतील आरोपींना शक्ती कायद्या अंतर्गत फाशीची शिक्षा द्या

Archana Banage

सातही नंदीध्वज मिरवणुकीने आज 68 लिंगांना तैलाभिषेक

Archana Banage

एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Archana Banage

संमेलनाध्यक्ष साहित्यावर बोललेच नाहीत : डॉ. अरुणा ढेरे

Archana Banage

सोलापुरात कोरोनाचा कहर, जिल्ह्याला जोडणारे 173 लहान व मोठे रस्ते बंद

Archana Banage
error: Content is protected !!