Tarun Bharat

सावर्डेत एकाची आत्महत्या

Advertisements

प्रतिनिधी / कुडचडे

सावर्डे जुवारी नदीच्या पात्रता काल सोमवार दि. 14 जून रोजी सकाळी अंदाजे 7.15 वाजता बागवाडा-सावर्डे येथील उल्हास साल्वादोर फर्नांडिस (50) याने उडी टाकून आत्महत्या केल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलीस व कुडचडे अग्निशामक दलाने घटना स्थळी धाव घेतली. पण मिळालेल्या माहिती नूसार ज्यावेळेस सदर व्यक्तीने पाण्यात उडी घेतली त्यावेळी तेथे डय़ुटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने बघितले व लगेच सदर व्यक्तीला वर काढले पण थोडय़ा वेळाने सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर घटनेचा पंचनामा निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश नाईक यांनी केला असून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव हॉस्पिसियो इस्पितळात पाठविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Stories

ब्रह्माकुमारीतर्फे वानरमाऱयांना मदत

Omkar B

वळपे येथे औषधवाहू वाहन उलटले

Patil_p

उसगांव दुचाकी अपघातात युवक ठार

Patil_p

शेतकऱयांच्या प्रश्नांकडे सरकारकडून दुर्लक्ष

Amit Kulkarni

कुडचडेत 26 पासून ‘द ग्रेट गणेश दर्शन’ महोत्सव

Amit Kulkarni

नवा सोमवार उत्सवाला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!