Tarun Bharat

सावर्डे पाटणकरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

प्रतिनिधी / सरवडे

कोरोनोच्या वाढत्या फैलावामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली असून देशात रक्ताची गरज भासत आहे. रक्ताची गरज ओळखून राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील आपले सरकार सेवा केंद्र व ज्ञानांकूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राधानगरीचे नायब तहसीलदार व्ही. व्ही. जाधव, आरोग्य अधिकारी शेटे, मंडल अधिकारी शिवाजी कोळी, तलाठी आर. बी. कांबळे, सरपंच विनोद कांबळे, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात आले. शिबिरात युवकांनी सक्रिय सहभाग घेतला.
रक्तदात्यांना मयुर पाटील, सचिन पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शिक्षण संस्था संस्थापक बबन पाटील, सुहास पाटील, विश्वास पाटील आदी उपस्थित होते. शिबिरास सी. पी. आर. चे डॉ. संदिप तुकडे, अमोलकुमार पाटील, राजू नदागिरे यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

कोल्हापूर : निवडणूक झाली, चिंता खर्चाची लागली

Archana Banage

नागझरी येथील शाळेवरील पत्रे वादळी वायामुळे उडून गेले

Patil_p

गुलाब कोमेजला… दहा वर्षात पहिल्यांदाच नीचांकी दर

Archana Banage

कोल्हापूर : पाचगाव ग्रामपंचायतीकडून घंटा गाड्यांचा वापर इतर कामांसाठी सुरू

Archana Banage

Google ने केलं कॉफी एस्प्रेसो मशीन्सच्या जनकाला अभिवादन

Kalyani Amanagi

धान्य दुकानदारांकडून सडलेला गहू वितरीत

Patil_p