Tarun Bharat

सावर्डे येथील दत्त व शिवक्रांती सहकारी संस्थेत ९७ लाखांचा घोटाळा

Advertisements

३२ जणांवर गुन्हा दाखल

पेठ वडगाव / प्रतिनिधी

सावर्डे ता.हातकणंगले येथील वडगांव बाजार समितीचे माजी संचालक नितीन चव्हाण यांचा गटाच्या दत्त विकास सेवा संस्था व शिवक्रांती विविध कार्यकारी सेवा संस्थेत ९७  लाखाचा अपहार झाला असल्याची फिर्याद लेखापरीक्षक यांनी वडगांव पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून या संस्थेत संचालक असलेल्या विद्यमान सरपंच सुरेखा चव्हाण यांच्यासह बाजार समितीचे माजी संचालक नितीन चव्हाण यांचेसह दोन्ही संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक, बँक निरीक्षक, सचिव अशा ३२ जणावर गुन्हे दाखल झाले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नितीन चव्हाण यांच्या दत्त विकास सेवा संस्थेत आर्थिक घोटाळ्याबाबत तक्रार झाली होती. यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे उपनिबंधक अनिल पैलवान यांनी परीक्षणात ६१ लाख तीस हजार सहाशे सत्तावीस घोटाळा झाल्याचे उघडकीस आणले. यामध्ये संचालक मंडळाने ताळेबंदास बनावट बोगस येणे कर्ज दर्शवून सभासद व कर्जदाराकडून कर्जापोटी रोखीने आलेल्या रक्कमा वसुली रीतसर जमा पावती काढून संबंधित कर्जास व किर्दीस जमा न घेता येणे कर्जबाकी आहे तशीच ठेवून रोखीने जमा झालेल्या रक्कमेची संगनमताने स्वतःच्या फायद्याकरीता गैरव्यवहार व अपहार करून ऊसपीक कर्ज, पोकळ येणे, खावटी कर्ज, पोकळ जमा अशा रक्कमा दाखवून सभासदांची संस्थेची व कर्जपुरवठा करणार्या बॅंकेची ६१ लाख ३० हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.

      यानुसार संस्थेचे संचालक नितीन विष्णू चव्हाण, सरपंच सुरेखा नितीन चव्हाण, सचिव संतोष गुलाबराव  पाटील, संचालक भैरवनाथ शंकर पाटील, बापूसो यशवंत भोसले, संजय शिवाजी चव्हाण, सुदाम शिवाजी इंगवले, सुशांत जगन्नाथ पाटील, बाबासो बाळासो चव्हाण, बाळासो संभा चौगुले, विकास हंबीरराव चव्हाण, विश्वास तुकाराम यादव, तानाजी भगवान शेळके, अय्याज इस्माईल मोमीन, सचिन जगन्नाथ कांबळे, आशादेवी रमेश भोसले, बँक निरीक्षक  कुमार भिमराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान शिवक्रांती विविध कार्यकारी सेवा संस्थेतही बनावट कर्जे दाखवून ३६ लाख तेरा हजार रुपयांचा अपहार संचालकांनी केल्याची फिर्याद लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांनी वडगांव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी सचिव संतोष गुलाबराव पाटील, संचालक संभाजी राजाराम चव्हाण, गणपतराव शामराव चव्हाण, सचिन विष्णू चव्हाण, अभय भिमराव चौगुले, गजाजन यशवंत खाडे, किरण दिनकर मगदूम, दत्तात्रय आत्माराम पाटील, अजित विजयसिंह देसाई, इकबाल इलाही मुल्ला, संतोष बाबुराव शेळके, भागवत भिमराव कांबळे, सविता माणिक चव्हाण, सुनीता संजय मगदूम (  सर्व रा. सावर्डे ) तर कुमार पाटील (रा.खोची) यांच्यावर वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे करीत आहेत.

Related Stories

दिव्यांग युवकांना मिळणार लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य

Abhijeet Shinde

करवीर तालुक्यात दिवसभरात 27 रुग्णांची भर

Abhijeet Shinde

शाहू महाराज फक्त महाराष्ट्राचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे आहेत – संभाजीराजे छत्रपती

Abhijeet Shinde

अन् ‘धामणी’चे कोरडे पात्र पाण्याने भरले

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरातील 6 गुंड जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार

Abhijeet Shinde

सोमय्यांचे स्वागत, पण बेताल वक्तव्य नको : मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!