Tarun Bharat

साविआच्या पार्टी मिटींगला सत्ताधारी नगरसेवकांची दांडी

खासदार उदयनराजे गटातील दुफळी पुन्हा चव्हाटय़ावर

प्रतिनिधी/ सातारा

सातारा विकास आघाडीत अनेक गटतट आहेत. हे वारंवार उघड झाले आहे. आघाडीचे नेते खासदार उदयनराजे यांनी अनेकदा कानउपटणी केली तरीही बुधवारी पुन्हा सातारा विकास आघाडीत दुफळी असल्याचे निदर्शनास आले. काही नगरसेवकांनी चक्क पार्टी मिटिंगलाच गैरहजेरी लागली. भाजप आणि नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांचे विषय डावलले गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकाने थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे तर नविआ सर्वसाधारण सभेतच दि. 3 रोजी साविआची कोंडी करणार आहे. त्याची रणनिती सुरू आहे.

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा दि. 3 रोजी ऑनलाईन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीची पार्टी मिटिंग नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबिनमध्ये बुधवारी पार पडली. यामध्ये उपाध्यक्ष मनोज शेंडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, किशोर शिंदे, राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, ऍड. दत्ता बनकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत सभेत सर्व विषय मंजूर करायचे अशी साधकबाधक चर्चा झाली. मात्र, या बैठकीला सातारा विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी गैरहजेरी लावली गेल्याने सातत्याने साविआमध्ये जो गटतट प्रकार दिसतो तो या ही वेळेला जाणवला. आधीच सातारा विकास आघाडीमध्ये अनेक मतप्रवाह, नाराजी आहे. ते वारंवार दिसून आले आहे. नेत्यांनी ही अनेकदा सूचनावजा कानपिचक्या दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे सातारा विकास आघाडीत ज्यांचे विषय घेतले नाहीत अशी नाराज मंडळी आज पार्टी मिटींगला दिसत नव्हती. त्यामुळे त्याचा फायदा आपोआपच नविआला होणार आहे. दरम्यान, भाजपचे नगरसेवक यांचे विषय डावलले गेल्याने आज त्या नगरसेवकानी थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. ही बाब सविआचे नगरसेवक दत्ता बनकर यांना समजताच त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध; काळे झेंडे दाखवत ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

datta jadhav

खैरेंना काहीही माहित नसतं; ते ढगात गोळ्या मारतात

datta jadhav

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार;भाजपची आज बैठक

Rahul Gadkar

एस.एम. देशमुख यांना विधान परिषदेवर घ्या

Patil_p

क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक आक्रमक, एनसीबीला दिलं जाहीर आव्हान

Archana Banage

पोलिसांच्या सहकार्याने अनफळेत बैलगाडी शर्यत

Patil_p