Tarun Bharat

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढील महिन्यापासून

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्रची परीक्षा 15 मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

विद्यापाठीची परीक्षा ऑनलाइन होणार असली तरी ती विद्यार्थ्यांच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर होणार की महाविद्यालय स्तरावर होणार याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात समजणार आहे.


पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होईल. तर द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 ते 20 मार्च या कालावधीत तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 30 मार्चपासून होणार आहे. 


गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर केला जाणार आहे. परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थांना पाच वेळा इशारा दिला जाईल, त्यानंतर आपोआपच परीक्षा बंद होणार आहे.

यासोबतच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी महाविद्यालयाच्या लॅबचा उपयोग केला जाईल. याबाबतचे परिपत्रक काढले जाईल, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले. 

Related Stories

दिलीप कुमार यांची आठवण ; पवारांनी सांगितला पहिल्या भेटीचा जेजुरीतील ‘तो’ किस्सा

Archana Banage

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली

datta jadhav

आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी नाकारली, तर श्रीकांत शिंदेंची सभा होणार

Archana Banage

मनसे आमदार राजू पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला सूचक इशारा; “कल्याणचा खासदार यापुढे…”

Archana Banage

अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करा; गोपीचंद पडळकरांची मागणी

Abhijeet Khandekar

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? उच्च न्यायालयात आज सुनावणी

Archana Banage
error: Content is protected !!