Tarun Bharat

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुणे नॉलेज क्लस्टर व आयुका यांच्यासोबत सामंजस्य करार

ऑनलाईन टीम / पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे नॉलेज क्लस्टर व इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमि अँड ऍस्ट्रॉफिजिक्स (आयुका) यांसोबत सामजंस्य करार केला आहे. या करारानुसार येत्या काळात पुणे नॉलेज क्लस्टर, आयुका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा या तीन संस्थांतर्फे  महत्वाच्या विषयावरील संशोधनाबरोबरच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.   

या सामंजस्य करारावेळी कुलगुरू प्रो. (डॉ.) नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक आयुका डॉ. सोमक रॉयचौधरी, प्रिंसिपल इन्व्हेस्टीगेटर पुणे नॉलेज क्लस्टर (माजी संचालक आयुका) प्रा. अजित केम्भावी, पुणे नॉलेज क्लस्टरचे डॉ. सुरेंद्र घासकड बी, वरिष्ठ प्रशासकीय संचालक, आयुका डॉ. निरंजन अभ्यंकर,  विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार, संचालक क्रीडा विभाग डॉ. दीपक माने,  संचालक , परीक्षा व मूल्यमापन मंडळ महेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

वाझे प्रकरणी संजय निरुपम यांचा शिवसेनेला घरचा आहेर

Archana Banage

सचिन तेंडुलकरने चाहत्यांना दिल्या संक्रांतीच्या हटके शुभेच्छा, घरच्यांनाही दिलं सरप्राईज

Archana Banage

चिमणी गिधाडांना भारी पडली!

Archana Banage

फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; तरुणावर गुन्हा

datta jadhav

समीर वानखेडे मुस्लिमच असल्याचा काझी मौलाना अहमद यांचा दावा

Archana Banage

प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा ; ईडीला कारवाई न करण्याचे आदेश

Archana Banage