Tarun Bharat

साहित्यिका अनुराधा गुरव यांच्या स्मृती दिनी आज ऑनलाईन कार्यक्रम

प्रतिनिधी / कोल्हापूर

सुप्रसिद्ध मराठी लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व शिवाजी विद्यापीठ प्रौढशिक्षण विभागाच्या माजी संचालक प्रा.अनुराधा गुरव यांचा प्रथम स्मृतिदिन रविवार दि.30 मे रोजी आहे. या निमित्ताने `प्रा.अनुराधा गुरव : ऑनलाईन आठवणींचा अंतरंग आविष्कार’ या ह्रद्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवार दि 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन होणार आहे.

यामध्ये प्रा. गुरव यांचे वाचक, विद्यार्थी, साहित्यिक, प्रकाशक, नातेवाईक, साहित्य व इतर संस्था प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे सहभागी होतील. तसेच त्यांच्या साहित्यावर झालेल्या अनेक संशोधन प्रबंधांपैकी एका संशोधन प्रबंधाचे ई पुस्तक रूपात प्रकाशन होणार आहे.

कोल्हापूर परिसर, महाराष्ट्र व देशभरातील ज्या संबंधितांना यात सहभागी व्हायचे, बोलायचे आहे त्यांनी आपल्या सहभागासाठी संयोजक प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांना 9422423660 व समन्वयक डॉ. आशिष गुरव यांना 7030660600 या नंबर वर संपर्क साधावा. त्या सर्वांना रविवारी सकाळी लिंक पाठविली जाईल.

Related Stories

काळाराम मंदिराच्या मंहंतावर संयोगिता राजे संतापल्या, पोस्ट व्हायरल

Archana Banage

विद्युत खांबावर चढून वीज कनेक्शन जोडणी : शेतकरी संघटनेची मोहीम

Abhijeet Khandekar

… तर कोल्हापुरात तांडव होईल; नितेश राणेंचा इशारा

Archana Banage

काळम्मावाडी धरण ८३.११ टक्के भरले

Archana Banage

गगनबावडा बसस्थानकाचा चेहरा – मोहरा बदलणार

Archana Banage

कोल्हापूर : हुपरीत गुटखा विक्रेत्यावर कारवाई; एकास अटक

Archana Banage
error: Content is protected !!