Tarun Bharat

‘साहित्य संगम’- साहित्य सेवेचा अखंडित नंदादीप

सातत्य हा ‘साहित्य संगम’चा विशेष आहे. गोव्यात किंवा महाराष्ट्रातही अशाप्रकारे तीन दशकांहून अधिक काळ अविरतपणे, अखंडितपणे साहित्य सेवेचा नंदादीप तेवत ठेवणारी संस्था दृष्टीपथात तरी नाही. मंडळाच्या सातत्यपूर्ण कार्यात कुठेही खंड पडू नये, याची जबाबदारी आता सर्व सदस्यांवर आहे व ती ते पार पाडतील, अशी अपेक्षा आहे.

संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचा वारसा सांगणाऱया पेडणे तालुक्यातील मांद्रे गावात ‘साहित्य संगम’ ही संस्था स्थापन झाली. या संस्थेचे आजतागायत अखंडित 374 मासिक कार्यक्रम झाले आहेत. कोरोना महामारीच्या काळातील देशबंदीतही आभासीपद्धतीने मासिक कार्यक्रम आयोजित करून ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. तीस वर्षांहून अधिक काळ अखंडित साहित्य सेवा दिल्याचे श्रेय या संस्थेचे कार्यवाह तथा साहित्यिक गणेशपुरी-म्हापसा येथील ‘विद्या भारती’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर व त्यांच्या टीमला द्यावे लागेल. सातत्य हा ‘साहित्य संगम’चा विशेष आहे. गोव्यात किंवा महाराष्ट्रातही अशाप्रकारे तीन दशकांहून अधिक काळ अविरतपणे, अखंडितपणे साहित्य सेवेचा नंदादीप तेवत ठेवणारी संस्था ही कदाचित एकमेव ठरू शकते.

एखादी संस्था सुरू करणे सोपे असते परंतु सुरू केलेली संस्था दीर्घकाळ चालविण्यासाठी मात्र जिद्द आणि चिकाटी लागते. आपल्या समाजात या जिद्दीचा आणि चिकाटीचा अभाव आहे. म्हणूनच ठिकठिकाणी अनेक संस्था व संघटना सुरू होतात आणि वर्ष-दोन वर्षांनी बंदही पडतात परंतु ज्या संस्था-संघटनांचे प्रवर्तक जिद्दी आहेत, त्या संस्था-संघटना मात्र वर्षांनुवर्षे टिकतात आणि कार्यरत राहतात. पेडणे तालुक्मयातील मांदे गावात 1990 मध्ये स्थापन करण्यात आलेले आणि आज एकतीस वर्षे अखंडितपणे कार्यरत असलेले ‘साहित्य संगम’ हे असेच एक साहित्यविषयक व्यासपीठ! दि. 17 मे, 1990 रोजी मांदे येथील मांदे हायस्कूलच्या एका वर्गखोलीत गावातील प्राथमिक शिक्षक रघुनाथ तथा सद्गुरु बाळकृष्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या परिसरातील 25 साहित्यप्रेमींची बैठक होऊन ‘साहित्य संगम’ची स्थापना झाली.

सध्या गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य असलेले गजानन हरिश्चंद्र मांदेकर यांनी त्यांचे शिक्षक सुहास मोरेश्वर पार्सेकर यांच्यासमवेत ही बैठक बोलावली होती.

प्रा. विठोबा बगळी, प्रा. पौर्णिमा केरकर, कै. अच्युत नाईक हे ‘साहित्य संगम’चे आतापर्यंत अध्यक्ष होऊन गेले. सुभाष शेटगांवकर हे गेली बरीच वर्षे ‘साहित्य संगम’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. परंतु कार्यवाहपदाची धुरा मात्र प्रारंभापासून प्राचार्य गजानन मांदेकर हेच सांभाळतात. दर महिन्याला साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा अखंडित ठेवण्याचे श्रेय अध्यक्ष सुभाष शेटगांवकर व अन्य सदस्य तसेच प्राचार्य गजानन मांदेकर यांनाच द्यावे लागेल. ‘साहित्य संगम’ची अखंडित वाटचाल हा सामूहिक कार्याचा, टीमवर्कचा नमूना आहे.

मध्यंतरी सप्टेंबर 2018मध्ये प्रा. गजानन मांद्रेकर यांची हृदयशस्त्रक्रिया झाली. त्यामुळे ‘साहित्य संगम’च्या स्थापनेपासून सर्व मासिक कार्यक्रमांस उपस्थित राहणाऱया प्रा. मांद्रेकर यांना प्रथमच सलग तीन महिने मासिक कार्यक्रमांस उपस्थित राहाता आले नाही. तेव्हाही मंडळाच्या मासिक कार्यक्रमांत खंड पडला नाही. 

परिसरातील नवोदित साहित्यिकांना व वाचकांना मोठे साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध होत नसते. मोठी व्यासपीठे ही मोठय़ा मंडळीसाठीच असतात. म्हणून अशा नवोदित साहित्यिकांना व वाचकांना त्यांच्या मनावर कसलाही ताण येणार नाही, असे आपलेच व्यासपीठ उपलब्ध करून, लेखन तथा वाचन संस्कृती वाढीस लावणे या हेतूने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

आजतागायत ‘साहित्य संगम’चे अखंडित 374 मासिक कार्यक्रम झाले आहेत. मोठे मासिक कार्यक्रम विद्यालयात किंवा सार्वजनिक सभागृहात आयोजित करण्यात येतात परंतु बहुतेक कार्यक्रम हे सदस्यांच्या घरीच घेतले जातात. स्वतःच्या साहित्याचे सादरीकरण, वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा, एखाद्या साहित्यिकाच्या समग्र साहित्यावर चर्चासत्र, व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, साहित्यिकांशी, कलाकारांशी संवाद असे मासिक कार्यक्रमांचे स्वरूप असते.

दरवषी साहित्यिक सहल काढली जाते. वाचनसंस्कृती वाढीस लावणे हा ‘साहित्य संगम’च्या स्थापनेमागील एक हेतू असल्याने अलिकडच्या काळात दरवषी एका नामवंत ग्रंथालयास भेट दिली जाते. आतापर्यंत या व्यासपीठावर मधु मंगेश कर्णिक, नारायण सुर्वे, फ. मु. शिंदे, रवींद्र पिंगे, डॉ. अ. रा. तोरो, प्रा. गोपाळराव मयेकर, डॉ. सोमनाथ कोमरपंत, विष्णू वाघ, दादा मडकईकर, विनय केळुसकर, माधवी देसाई, ल.मो. बांदेकर, रामविजय परब असे नामवंत साहित्यिक व प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, राजन ताम्हाणे, जयंत सावरकर, कै. उदय म्हैसकर, कै. जगन्नाथ कांदळगावकर, आशा शेलार, माधव? वझे, प्रसाद पंडित असे सुप्रसिद्ध कलाकार येऊन गेले आहेत.

हौशी रंगभूमीवरील नामवंत नाटककार रमाकांत पायाजी, कै. श्रीकृष्ण आरोसकर, पांडुरंग गावडे यांच्या नाटकांवर चर्चासत्रेही आयोजित केली आहेत. सुप्रसिद्ध नाटककार विनय केळुसकर, रामविजय परब, ज्ये÷ अभिनेते कै. उदय म्हैसकर यांच्या मुलाखतीही ‘साहित्य संगम’च्या व्यासपीठावरून रंगलेल्या आहेत. तिनशेवा मासिक कार्यक्रम पालये येथे संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या जन्मस्थानी सुप्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला होता. याच कार्यक्रमापासून ‘अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ हे  ब्रीदवाक्मय म्हणून स्वीकारले. वाचनाची आवड वाढीस लागावी आणि प्रत्येकाच्या घरात स्वतःचे असे छोटेखानी ग्रंथालय असावे या उद्देशाने ‘साहित्यसंगम पुस्तक भेट योजना’ तीनवेळा राबविण्यात आली आहे.

राजेश परब

Related Stories

मुख्यमंत्र्यांच्या मुलीलाच ऑनलाईन गंडा

Patil_p

पाच राज्यांमधील निवडणुका टळणार ?

Patil_p

दिल्लीत 2,706 नवे कोरोना रुग्ण; 69 मृत्यू

Tousif Mujawar

मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ होणारच!

Patil_p

दावणगेरेत 24 तासांत 21 रुग्ण

Patil_p

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 83 लाख 64 हजार 086 वर

Tousif Mujawar