Tarun Bharat

सिंधियांना मिळणार रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

मोदी सरकार 2.0 चे 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात मोदींनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंसोबत चर्चा केली आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळ  विस्तारात राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचा दावा सिंधिया यांच्या ज्येष्ठ समर्थकांकडून करण्यात येत आहे.  

सिंधिया यांनी मागील वर्षी मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकार पाडण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांना भाजपात येऊन 15 महीने झाले आहेत. आता भाजप त्यांना दिलेले वचन पूर्ण करणार आहे. सिंधिया यांना केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालयाची किंवा शहर विकास, मानव संसाधन मंत्रालयाचीही जबाबदारी दिली जाण्याची चर्चा सुरू आहे.

Related Stories

पंजाबमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 5414 वर

Tousif Mujawar

सर्वेश प्रभुखानोलकर याचे सी .ए .अंतिम परीक्षेत उज्ज्वल यश

Anuja Kudatarkar

राजस्थानमधील 8 शहरांमध्ये आजपासून ‘नाईट कर्फ्यू’

Tousif Mujawar

रवींद्र जडेजाने CSK चं कर्णधारपद सोडलं

Archana Banage

2 महिला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार

Patil_p

मेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Archana Banage