Tarun Bharat

“सिंधुदिशा”तर्फे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

ओटवणे/ प्रतिनिधी-

तेरेखोल नदीच्या महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून ओटवणे दशक्रोशित यापूर्वीही गरजूंना मदत करण्यात आलेली आहे. तसेच परीसरात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

त्यामुळे या भागात पुराचे संकट ओढवल्याने विलवडे गावातील १२, ओटवणे गावातील ६, सरमळे गावातील एका अशा एकूण १९ कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. संस्थेचे मुंबई येथील अध्यक्ष रुपेश परब यांनी सरमळे, ओटवणे, विलवडे या तिन्ही गावातील पूर हानीची माहिती घेत पूरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तू वितरण करण्याचा निर्णय घेतला. रूपेश परब यांच्या सूचनेनुसार संस्थेचे पदाधिकारी सिध्देश गवस, हेमंत परब, श्रीधर परब यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.

Related Stories

युवा रक्तदाता संघटनेने रक्ताच्या नात्यासह जोपासली सामाजिक बांधिलकी

NIKHIL_N

सिंधुदुर्गात आणखी सात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

NIKHIL_N

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करा!

NIKHIL_N

अभिनयासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे!

NIKHIL_N

गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारी गाडी पकडली

Patil_p

एसटीचे 483 कर्मचारी सेवेत, 168बसफेऱया मार्गस्थ

Patil_p