Tarun Bharat

सिंधुदुर्गचा ‘जीडीपी’ वाढण्यात जिल्हा बँकेचा मोठा वाटा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे गौरवोद्गार : जिल्हा बँकेच्या विविध पुरस्कारांचे जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते वितरण

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात चांगले काम करीत शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे. जिल्हय़ाचा ‘जीडीपी’ वाढण्यामध्ये जिल्हा बँकेचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा बँकेमार्फत विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले.

सहकारात उत्कृष्ट काम करणाऱया संस्था, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत दिल्या जाणाऱया पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते बुधवारी ओरोस येथील शरद कृषी भवन सभागृहामध्ये करण्यात आले. या सोहळय़ास बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, जिल्हा बँक उपाध्यश सुरेश दळवी, विकास सावंत, अविनाश माणगावकर, आत्माराम ओटवणेकर, नीता राणे, सर्व संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली, पुरस्कार प्राप्त मान्यवर, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सहकारी संस्था, संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जिल्हा बँकेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्यावर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

सहकार बंद होता नये – सुधीर सावंत

सहकार क्षेत्र बंद करण्याचा जो उद्योग देशात सुरू आहे, तो बंद झाला पाहिजे. आम्ही ‘समृद्ध, आनंदी गाव’ हा विषय घेउन पुढे जात आहोत. त्याला जिल्हा बँकेने सहकार्य करावे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा जिल्हा घडू शकतो. गावात केवळ रस्ते बांधून, पाणी आणून काही होणार नाही. मूळ मुद्दा आहे तो रोजगार व विकासाचा. जिल्हय़ातील तरुण ज्या दिवशी कोकण सोडून बाहेर जाणार नाहीत, त्या दिवशी जिल्हय़ाचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा बँक जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी यावेळी केले.

जिल्हा बँक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत – सतीश सावंत

जिल्हा बँक अध्यश सतीश सावंत यांनी अध्यक्षीय भाषणात सभासदांच्या प्रश्नांना समर्थक उत्तरे दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या साडेसहा वर्षात जे काही काम केले, ते सर्वांसाठी व बँकेसाठी केले. भविष्यात ही बँक या पेक्षाही चांगेल काम करीत महाराष्टातच नव्हे, तर देशात अग्रणी बँक बनेल. येणाऱया निवडणुकीत कसलेही राजकारण न आणता जिल्हय़ातील सहकार वृद्धिंगत होण्यासाठी काम केलं जाईल. बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शेतकरी व सहकारी संस्था यांच्या हितासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते कोणतेही राजकारण न आणता घेतले जातील. ही बँक सहकार क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात अग्रेसर राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विविध पुरस्कारांचे वितरण

शिवराम भाऊ जाधव स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार सैनिक नागरी सह. पतसंस्था मर्या. सावंतवाडी यांना देण्यात आला. केशवराव राणे स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार भालचंद्र केशव वारंग (अध्यक्ष, तुळसुली विकास संस्था, तुळसुली) यांना देण्यात आला.

उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार

उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार कृष्णा दामोदर कर्ले, खारेपाटण विकास सोसायटी, खारेपाटण यांना देण्यात आला. भाईसाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ कृषिमित्र पुरस्कार राजाराम यशवंत मावळणकर यांना देण्यात आला तर बाळासाहेब सावंत स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांना देण्यात आला.

Related Stories

कर्मचाऱयांअभावी मालवण कोविड सेंटर बंद होण्याची भीती?

NIKHIL_N

‘उमेद’ चे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी शासनाकडून ‘बेदखल’

Patil_p

ऍपेक्स’ची डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल मान्यता रद्द

Patil_p

सख्खा भाऊ पक्का वैरी! ओवळीयेत माजी उपसरपंचाचा निर्घूण खून, भावाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Archana Banage

शाळकरी मुलांच्या अपहरणाबाबत ग्रामस्थांनी सतर्क रहावे- सरपंच अक्रम खान

Anuja Kudatarkar

हेदुळ, ओवळियेतही अतिप्राचिन कातळशिल्पे

NIKHIL_N
error: Content is protected !!