Tarun Bharat

सिंधुदुर्गचे नवे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे

Advertisements

दीक्षितकुमार गेडाम यांची सांगली येथे बदली

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पोलीस अधीक्षकपदी मुंबई गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी ते कार्यभार स्वीकारणार आहेत. तर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची सांगली जिल्हय़ाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात साडेतीन वर्षे एवढा सर्वाधिक काळ राहणारे गेडाम हे पहिले पोलीस अधीक्षक आहेत.

गेडाम यांनी 29 एप्रिल 2017 रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर जवळ-जवळ साडेतीन वर्षांनी त्यांची बदली झाली आहे. आपल्या साडेतीन वर्षांत अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळली. त्यामुळे जिल्हय़ात गुन्हय़ांचे प्रमाण कमी झाले तसेच शिक्षेचे प्रमाण वाढले. त्यांच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. कोरोना संकट काळातही चांगली परिस्थिती हाताळली. संपूर्ण जिल्हय़ात सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसवली. पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प साकारला. अतिशय चांगले काम करीत सिंधुदुर्ग जिल्हय़ात शांतता निर्माण केली. त्यांचा नियत कालावधी संपल्यामुळे बदली करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश शासनाने काढले. त्यात गेडाम यांची सांगली जिल्हय़ाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुंबई गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांची शासनाने नियुक्ती केली असून ते लवकरच हजर होणार आहेत.

Related Stories

रत्नागिरी : संगमेश्वरात शिवसेनेच्यावतीने शासनाचा निषेध

Archana Banage

शासकीय जागेतले ”ते” बांधकाम हटविण्यात यावे ; संतोष नानचे यांचं निवेदन…वाचा काय आहे प्रकरण ?

Anuja Kudatarkar

रत्नागिरी विमानतळ जागेसाठी एकही हरकत नाही

Patil_p

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी

Patil_p

‘निसर्ग’मागोमाग अवकाळीचा कोप!

Patil_p

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत ३२६ भारतीय लंडनहून मायदेशी दाखल

Archana Banage
error: Content is protected !!